मनोरंजन

राजकारणी, कवी, पंतप्रधान... अटलजींच्या भूमिकेतील या अभिनेत्याला ओळखले का?

२५ डिसेंबर म्हणजे माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी विजयी यांची जयंती. यानिमित्ताने त्यांच्या बायोपिकची पहिली झलक आली समोर

प्रतिनिधी

२५ डिसेंबर म्हणजे अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती. देशाचे माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी हे एक कुशल राजकारणी, एक मितभाषी नेतृत्व, कवी आणि संवेदनशील व्यक्तिमत्व होते. अशा अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची घोषणा काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती. यामध्ये सुप्रसिद्ध अभिनेता पंकज त्रिपाठी हे अटल बिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारणार आहे.

या चित्रपटाची पहिली झलक त्यांच्या जयंतीनिमित्त प्रसिद्ध करण्यात आली. मराठमोळा दिग्दर्शक रवी जाधव हा या चित्रपाटाचे दिग्दर्शन करणार असून या चित्रपटाचे नावदेखील जाहीर करण्यात आले. 'मै अटल हूं..' असा या चित्रपटाचे नाव आहे. पंकज त्रिपाठी आणि रवी जाधव यांनी एक व्हिडीओ शेअर करत अटल बिहारी वाजपेयी याच्या विविध छटा पंकजच्या रूपाने दाखवण्यात आल्या आहेत.

अभिनेता पंकज त्रिपाठीने यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाला आहे की, "अटल बिहारी वाजपेयी यांचे व्यक्तित्व पडद्यावर साकारण्यासाठी अत्यंत संयमाने मला स्वतःच्या व्यक्तिमत्वावर काम करणे गरजेचे आहे, याची मला पूर्ण जाणीव आहे. पण स्फूर्ति आणि मनोबलाच्या जोरावर मी या भूमिकेला न्याय देऊ शकेन असा मला अटल विश्वास आहे." अनेकांनी त्याच्या या पोस्टवर शुभेच्छा दिल्या आहेत. हा चित्रपट २५ डिसेंबर २०२३ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी