मनोरंजन

सिद्धार्थने १३ हजार फूट उंचीवर 'योद्धा'चे पहिले पोस्टर केले रिलीज, 'या' तारखेला प्रदर्शित होणार सिनेमा

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा हा लवकरच 'योद्धा' या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Swapnil S

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा हा लवकरच 'योद्धा' या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेल्या या चित्रपटाचे पहिले पोस्टर अखेर रिलीज झाले आहे. या ॲक्शन-थ्रिलर चित्रपटाचे पोस्टरही तितक्याच हटके पद्धतीने रिलीज करण्यात आले.

धर्मा प्रोडक्शनने दुबईत १३ हजार फूट उंचीवर 'योद्धा'चे पोस्टर रिलीज केले. सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि करण जोहरने नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये आकाशातील खतरनाक स्टंट दिसतोय. दुबईमध्ये स्काय डायव्हिंग करुन 'योद्धा'चे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे.

हा पक्षी आहे की विमान? नाही...हा आमचा योद्धा! आकाशात उंच भरारी घेत, आम्ही १९ फेब्रुवारीला योद्धाच्या टीझरसह लँडिंगसाठी नेहमीप्रमाणे तयार आहोत. मग भेटूया!, असे कॅप्शनही धर्मा मुव्हिजने व्हिडिओसह दिले आहे. हा चित्रपट १५ मार्च रोजी सिनेमागृहात रिलीज होईल असा खुलासाही पोस्टमध्ये केला आहे.

चित्रपटाची स्टार कास्ट-

'योद्धा' या चित्रपटामध्ये सिद्धार्थ मल्होत्रासोबत राशी खन्ना आणि दिशा पटानी मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन सागर आंब्रे आणि पुष्कर ओझा यांनी केले आहे.

ओबीसी आरक्षणाला धक्का नाही! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही; नोंदी असलेल्यांनाच कुणबी प्रमाणपत्र मिळणार

‘देवाभाऊ’ कॅम्पेनवरून जोरदार वादंग; जाहिरात देणारा भाजपच्या मित्रपक्षाचा मंत्री - रोहित पवार

मुंबईला मिळणार वातानुकूलित वंदे मेट्रो; २ हजार ८५६ डब्यांच्या खरेदीची निविदा जाहीर

निवडणूक आयोग भाजपचे कार्यालय बनले का? मल्लिकार्जुन खर्गे यांची टीका

अस्तित्व वाचवण्यासाठी ओमी कलानींची धडपड; अखेर युतीसाठी शिंदे गटाचा दरवाजा ठोठावला