मनोरंजन

आजपासून 'हृदयी प्रीत जागते' मालिका प्रेक्षकांच्या भेटीला 

प्रतिनिधी

आजपर्यंत आपण चित्रपटाचे भव्य प्रीमियर होताना पाहिलेत. पण मालिका विश्वात प्रथमच इतका मोठा भव्य दिव्य प्रीमियर सोहोळा मालिकेच्या सेटवर खुल्या मैदानात पार पडला. निमित्त होते मंदार देवस्थळी दिग्दर्शित संगीतमय प्रेमकथा 'हृदयी प्रीत जागते' ह्या मालिकेच्या शुभारंभाचं, 

'हृदयी प्रीत जागते' ही मालिका एक तरुण संगीतमय प्रेमकथा असून. ही कथा दोन तरुणांची आहे जे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.  ह्या मालिकेतील नायिका एक निस्वार्थी, प्रामाणिक आणि आज्ञाधारक मुलगी आहे जी एका नम्र कुटुंबातील आहे. तर नायक प्रचंड हुशार, मोहक मुलगा आहे आणि त्याला पाश्चिमात्य संगीताची आवड आहे. हे दोघेही त्यांच्या स्वभावात आणि जीवनशैलीत वेगळे ध्रुव आहेत पण संगीत हा त्यांच्यातील एकमेव समान धागा आहे. नायिका कीर्तन गायिका आहे आणि त्यांच्या घरात कीर्तनाची परंपरा आहे.  तर नायक रॉक बँड परफॉर्मर आहे. ही भिन्नता असूनसुद्धा दोघांचंही संगीतावर जीवापाड प्रेम आहे. आता हेच संगीत ह्या दोन आत्म्यांना कसं एकत्र आणते हे बघणं प्रेक्षकांसाठी औत्सुक्याचं असणार आहे.सिद्धार्थ खिरीद आणि पूजा कातुर्डे ही तरुण जोडी ह्या मालिकेच्या निमित्ताने प्रथमच मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सोबतच या मालिकेत पंकज विष्णू, राजन भिसे, पौर्णिमा तळवलकर यांसारखे एका पेक्षा एक मातब्बर ह्या मालिकेत दिसणार आहेत. मालिकेचे लेखन केलं आहे अभिजीत शेंडे यांनी, तर झी मराठीवर अनेक सुपरहिट मालिका देणारे दिग्दर्शक मंदार देवस्थळी यांनी या मालिकेचं दिग्दर्शन केलं आहे. राजेश जोशी यांनी या मालिकेची निर्मिती केली आहे . आजपासून म्हणजेच ७ नोव्हेंबरपासून रात्री ८ वा झी मराठीवर हि मालिका सुरु होत आहे. 

'त्या' कंपनीचे अजून ८ बेकायदा होर्डिंग्ज, BMC ची रेल्वेला नोटीस; पालिकेने होर्डिंग हटवल्यास खर्च रेल्वेकडून वसूल करणार

३० होर्डिंग्जचे नूतनीकरण स्थगित: स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी प्रमाणपत्र सादर न केल्याने दणका

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या दीड तासांचा ब्लॉक, 'या' वेळेत वाहतूक राहणार बंद

मध्य रेल्वे मार्गावर रविवारी ब्लॉक; पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा

येत्या आठवड्यात बारावीचा निकाल