PM
मनोरंजन

'हनुमान'वर रामलल्ला 'प्रसन्न'! चित्रपटाची सलग दुसऱ्या आठवड्यात यशस्वी घोडदौड, तब्बल 'इतक्या' कोटींची कमाई

Swapnil S

साऊथचा स्टार तेजा सज्जाच्या 'हनुमान' या चित्रपटाची चांगलीच क्रेझ पाहायला मिळत आहेत. हा चित्रपट १२ जानेवारी २०२४ ला थिएटरमध्ये रिलीज झाला. तेव्हापासून या सिनेमाची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड सुरू आहे. चित्रपट रिलीज होऊन ११ दिवस झाले असून चित्रपटाला भारतामध्ये जोरदार प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

'सॅकल्निक'च्या अहवालानुसार, राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेच्या दिवशी म्हणजेच ११ व्या दिवशी या चित्रपटाने ७. ५० कोटींची कमाई केली. चित्रपटाला दोन्हीही विकेंडला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला. हा चित्रपट हिंदी, तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषेमध्ये रिलीज करण्यात आला आहे.

आतापर्यंत कमाई किती?-

-पहिल्या दिवशी ८.५ कोटी

-दुसऱ्या दिवशी १२.४५ कोटी

-तिसऱ्या दिवशी १६ कोटी

-चौथ्या दिवशी १५.२ कोटी

-पाचव्या दिवशी १३.११ कोटी

-सहाव्या दिवशी ११.३४ कोटी

-सातव्या दिवशी ९.५ कोटी

-आठव्या दिवशी १०.५ कोटी

-नवव्या दिवशी १४.६ कोटी

-दहाव्या दिवशी १६.५० कोटी

-अकराव्या दिवशी ७.५ कोटी

या चित्रपटाने आतापर्यंत भारतात १३९.५५ तर जगभरामध्ये तब्बल २०० कोटींची कमाई केली आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शिन प्रशांत वर्मा यांनी केले आहे. हा चित्रपट अवघ्या २० कोटींमध्ये निर्मित झाला होता. चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत तेजा सज्जासह अमृता अय्यर, वरलक्ष्मी शरतकुमार, विनय राय, राज दीपक शेट्टी, वेन्नेला किशोर अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळतेय. तर, चित्रपटाची निर्मिती एस. निरंजन रेड्डी आणि के निरंजन रेड्डी यांनी केली आहे.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस