मनोरंजन

'सत्य सांगणं इतकं कठीण झालंय का?' केतन अग्रवाल प्रकरणावर हिना खानची प्रतिक्रिया; म्हणाली, "त्याचा जीव वाचला असता...

‘आजच्या काळात सत्य सांगणं इतकं कठीण झालंय का?’ केतन अग्रवाल प्रकरणावर अभिनेत्री हिना खानने प्रतिक्रिया देत भावना व्यक्त केले.

Mayuri Gawade

पुण्यातील केतन अग्रवाल मृत्यूप्रकरण सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरला आहे. लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगदरम्यान झालेला त्याचा मृत्यू सुरुवातीला अपघात मानला जात होता. मात्र, पोलिस तपासात समोर आलेल्या धक्कादायक खुलाशांनंतर या प्रकरणाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. या पार्श्वभूमीवर अभिनेत्री हिना खान हिने सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत, 'फक्त एक सत्य सांगितलं असतं, तर त्याचा जीव वाचू शकला असता,' असे म्हणत हळहळ व्यक्त केली.

हिना खानची प्रतिक्रिया

केतन अग्रवाल प्रकरणावर प्रतिक्रिया देताना हिना खानने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर करत भावना व्यक्त केल्या.

"आजच्या काळात सत्य ऐकणं आणि सत्य सांगणं इतकं कठीण झालं आहे की लोक एखाद्याचा जीव घेण्यासही तयार होतात. सत्य स्वीकारण्यापेक्षा एखाद्याचा जीव घेणं सोपं वाटतं. फक्त एक सत्य सांगितलं असतं, तर त्याचा जीव वाचू शकला असता आणि तुम्ही तुमचं आयुष्य तुमच्या पसंतीच्या व्यक्तीसोबत जगू शकला असता. मग हे का?" अशा शब्दांत हिनाने खंत व्यक्त केली. तिने पोस्टसोबत #KetanMurderCase हा हॅशटॅगही वापरला.

हिना खानने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर करत भावना व्यक्त केल्या.

प्रकरणाची पार्श्वभूमी

केतन अग्रवाल हा पुण्यातील गहुंजे येथील तरुण व्यावसायिक होता. तो आपल्या कुटुंबाच्या रिअल इस्टेट व्यवसायात संचालक म्हणून कार्यरत होता. त्याचा सिया गोयलसोबत साखरपुडा झाला होता आणि दोन्ही कुटुंबांकडून नोव्हेंबर महिन्यात उदयपूर येथे विवाहसोहळ्याची तयारी सुरू होती.

दरम्यान १८ जून रोजी लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगदरम्यान केतन अग्रवालचा मृत्यू झाला. सुरुवातीला ही घटना अपघात मानली गेली होती. मात्र पोलिस तपासात हा पूर्वनियोजित कट असल्याचो समोर आले आहे. या प्रकरणात सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने दोघांना २९ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

तपासात समोर आलेले आरोप

पोलिस तपासानुसार, सिया गोयलला केतनशी लग्न करायचे नव्हते. चेतन चौधरीसोबतच्या संबंधांमुळे दोघांनी मिळून केतनला मार्गातून दूर करण्याचा कट रचल्याचा आरोप आहे. तपासात असेही समोर आले आहे की यापूर्वीही केतनला इजा पोहोचवण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

या प्रकरणात दोन्ही आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून तपास यंत्रणांकडून डिजिटल पुरावे, कॉल रेकॉर्ड आणि सीसीटीव्ही फुटेजची सखोल चौकशी सुरू आहे.

बदलीच्या तक्रारीसाठी पोलिसांना कार्यालयात आणणे गैरवर्तन; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल

प्रियकरासोबत पळून गेल्यास कुटुंबाची बदनामी झाली असती; मग होणाऱ्या नवऱ्यालाच दरीत ढकललं, केतन अग्रवाल प्रकरणात नवी माहिती

Mumbai : महापौरांसमोरच मॅनहोलमध्ये पडला सफाई कर्मचारी; अधिकाऱ्यांना निलंबनाचा इशारा, Video

Mumbai Rain : मुसळधार पावसाने मुंबईची दाणादाण! ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावर परिणाम, पुढील ४८ तास महत्त्वाचे

Mumbai : मुसळधार पावसात धावत्या लोकलमध्ये क्षुल्लक वाद विकोपाला; २२ वर्षीय तरुणाची चाकू भोसकून हत्या, आरोपी फरार