@suyashtlk/ Instagram
मनोरंजन

"मला मतदान करु दिले नाही, कारण..."; अभिनेता सुयश टिळकने व्यक्त केली खंत; सोशल मीडियावर झाला व्यक्त

Suyash Tilak: अभिनेता सुयश टिळकला यंदा मतदान करता आलेलं नाही. याबद्दल अभिनेत्याने सोशल मीडियावर एक पोस्ट करत आपली नाराजी व्यक्त केली आहे.

Tejashree Gaikwad

Pune Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात आज (दि.१३) देशातील ९६ मतदारसंघात मतदान होत आहे. यात राज्यातील ११ मतदारसंघात सकाळी ७ वाजल्यापासूनच नागरिक मतदान करण्यासाठी बाहेर पडले आहेत. सामान्य नागरिक ते दिग्गज नेते, मनोरंजन क्षेत्रातील कलाकार मंडळीही मतदान करत आहेत. पुण्यात अनेक कलाकारांनी सकाळीच त्यांचा मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान मराठी अभिनेता सुयश टिळकला मात्र यंदा मतदान करता आलेलं नाही. याबद्दल अभिनेत्याने सोशल मीडियावर एक पोस्ट करत आपली नाराजी व्यक्त केली आहे.

"दुर्दैवाने यंदा मला मतदानाचा अधिकार नाकारण्यात आला. कारण, यावर्षी माझे नाव गूढपणे यादीतून गायब झाले", अशा कॅप्शनसह सुयशने घडलेला प्रकार एका पोस्टद्वारे सांगितला. "गेल्यावेळी मतदान केले तेव्हा नावात चूक असल्याने, नाव सुधारण्यासाठी अर्ज दिला होता. यावेळी सुदैवाने ऑनलाईन पोर्टलवर खूप शोधाशोध केल्यावर नाव सापडलं. पण त्यातही ती चूक होतीच. वोटींग बूथवर सकाळी ७ वाजता पोहोचल्यावर बघितले तेव्हा यादीत मात्र वेगळेच नाव होते. म्हणून ३ तास वेगवेगळ्या बूथवर जाऊन नाव शोधायचा प्रयत्न केल्यावर अचानक काही जणांचा मतदार संघच बदलल्याचे समजले. त्यामुळे वेगळ्या मतदारसंघातपण चौकशी केली, शोधाशोध केली. गेली अनेक वर्षे मी न चुकता मतदान करत आलो आहे. पण, यावेळी मला तो हक्क बजावता आला नाही. कोणत्याही ईतर पर्यायाने देखील मतदान करू दिले नाही याची खंत वाटते, वाटत राहील", अशा आशयाची पोस्ट करीत सुयश व्यक्त झाला.

आतापर्यंत पुणे मतदार संघात श्रुती मराठे, सुभोध भावे, प्रवीण तरडे, सोनाली कुलकर्णी, गायिका बेला शेंडे यासह अनेक कलाकारांनी मतदान केले आहे.

Maratha Reservation : सलग तिसऱ्या दिवशी वाहतूक विस्कळीत; CSMT परिसरात आंदोलकांचे बस्तान

Maratha Reservation: आंदोलनाची धग वाढणार; मनोज जरांगे आजपासून पाणी पिणेही बंद करणार; एकतर विजययात्रा, नाहीतर अंत्ययात्रा

Maratha Reservation : दक्षिण मुंबईत आज पुन्हा कोंडीची शक्यता

Maratha Reservation : CSMT परिसरात अस्वच्छता; राज्यभरातून अन्नपदार्थांचा ओघ वाढल्याने नासाडी

Maratha reservation protest : सुप्रिया सुळेंना आंदोलकांचा घेराव; गाडीवर बाटल्या भिरकावल्या