@pavithrajayaram_chandar/ Instagram
मनोरंजन

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीचा कार अपघातात जागीच मृत्यू, बहिणीसह तिघे जखमी

Pavitra Jayaram: या प्रसिद्ध अभिनेत्रीचा १२ मे रोजी हैदराबाद येथे कार अपघातात मृत्यू झाला. तिचा जागीच मृत्यू झाला, तर सहप्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

Tejashree Gaikwad

Kannada TV actress Pavitra Jayaram Dies: प्रसिद्ध तेलुगू व कन्नड टेलिव्हिजन अभिनेत्री पवित्रा जयराम हिचे रविवारी, १२ मे रोजी हैदराबाद येथे एका कारअपघातात निधन झाले. आंध्र प्रदेशातील मेहबूबा नगरजवळ झालेल्या भीषण कार अपघातात तिचा जागीच मृत्यू झाला.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कारचे नियंत्रण सुटून कार दुभाजकावर आदळली. त्यानंतर हैदराबादहून वनपर्थीकडे येणारी बस कारच्या उजव्या बाजूला धडकली. या अपघातात पवित्रा गंभीर जखमी झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.

कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यातील हनाकेरे येथून परतत असताना हा अपघात झाला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पवित्राची चुलत बहिण अपेक्षा, ड्रायव्हर श्रीकांत आणि अभिनेता चंद्रकांत या घटनेत गंभीर जखमी झाले आहेत.

पवित्रा जयराम ही तेलुगू व कन्नड टेलिव्हिजनची फार लोकप्रिय अभिनेत्री होती. ती तिच्या टीव्ही मालिका 'त्रिनयणी'मधील भूमिकेसाठी ओळखली जात होती. तिच्या आकस्मिक निधनाने कन्नड आणि तेलुगू टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून अद्याप अधिक माहिती मिळालेली नाही. अभिनेत्रीच्या निधनाबद्दल चाहत्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अभिनेता समीप आचार्यने अभिनेत्रीच्या निधनावर सोशल मीडियावर शोक व्यक्त केला. त्याने लिहिले, "तू आता नाहीस या बातमीने जाग आली. हे अविश्वसनीय आहे. माझी पहिली ऑन-स्क्रीन आई, तू नेहमीच खास राहशील."

कन्नड टेलिव्हिजन मालिकेतील भूमिकांसाठी पवित्रा खूप प्रसिद्ध होती. त्याशिवाय तिने इतर भाषांमध्येही काम केले. पवित्राने तेलगू मालिकांमध्येही तिच्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली होती.

एकत्र आणणं माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं; राज ठाकरेंचा हल्लाबोल

''कुठचाही 'झेंडा' नाही, मराठी हाच 'अजेंडा'; माझ्या मराठीकडे-महाराष्ट्राकडे वेड्यावाकड्या नजरेने पाहायचं नाही,'' वाचा राज ठाकरे यांचं संपूर्ण भाषण

दोघा पुतण्यांचे हात धरून सुप्रिया सुळेंनी काकांच्या शेजारी केलं उभं; पहा Video

''जर इथे येऊन धंदा करताय तर मराठी बोलायची लाज कसली?'' अभिनेते भरत जाधव यांचा संतप्त सवाल

गुजरातेत हिंदी सक्ती नसेल, तर ती महाराष्ट्रात कशासाठी? खासदार सुप्रिया सुळे यांचा संतप्त सवाल