संग्राहित छायाचित्र 
मनोरंजन

लैला खान हत्याकांड: शिक्षेचा उद्या फैसला, फाशीची शिक्षा देण्याची सरकारी पक्षाची मागणी

बॉलीवूड अभिनेत्री लैला खान व तिच्या कुटुंबातील पाच जणांच्या हत्याकांड प्रकरणात दोषी ठरविण्यात आलेल्या परवेझ टाक याला सत्र न्यायालय शुक्रवारी शिक्षा ठोठावणार आहे.

Swapnil S

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री लैला खान व तिच्या कुटुंबातील पाच जणांच्या हत्याकांड प्रकरणात दोषी ठरविण्यात आलेल्या परवेझ टाक याला सत्र न्यायालय शुक्रवारी शिक्षा ठोठावणार आहे. सरकारी पक्षाने हे दुर्मिळ प्रकरण असल्याने आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी न्यायालयाकडे केली आहे. २०११ मध्ये उघडकीस आलेल्या या हत्याकांडाने बॉलीवूड जगतासह सर्वत्र खळबळ उडाली होती.

इगतपुरी येथील फार्म हाऊसच्या आवारात बॉलीवूड अभिनेत्री लैला खान, तिची आई सेलिना व चार भावंडांची हत्या झाली. ही घटना फेब्रुवारी २०११ मध्ये उघडकीस आली. त्यानंतर पोलिसांनी ८ जुलै २०१२ रोजी परवेझला अटक केली, तेव्हापासून तो तुरुंगात आहे. याप्रकरणी सत्र न्यायालयाने गेल्या आठवड्यात आरोपी परवेझला दोषी ठरवले.

सर्वोच्च न्यायालयाने निश्चित केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार परवेझला फाशीची शिक्षा ठोठावण्यात यावी, असा आग्रही युक्तिवाद सरकारी पक्षाने केला आहे. तर फाशीऐवजी जन्मठेपेची शिक्षा द्यावी, कारण त्याच्या वर्तणुकीत बराच बदल झाला असल्याचा युक्तिवाद परवेझचे वकील वहाब खान यांनी केला आहे.

मराठवाड्यात कोसळधार! ढगफुटी सदृश्य पावसाने गावांचा संपर्क तुटला, शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान

आता नोकरी मिळवणे होणार सोपे! केंद्र सरकार तयार करतेय ‘डॅशबोर्ड’

मतदार यादी सखोल परीक्षणासाठी सज्ज व्हावे; केंद्रीय निवडणूक आयोगाचे निर्देश

नवीन GST सुधारणांमुळे ग्राहकांना दिलासा; आजपासून अन्न, गृहनिर्माण, इलेक्ट्रॉनिक्स, औषधे, वाहने, शेती, आरोग्यसेवा स्वस्त

Mumbai : महालक्ष्मी मंदिरात ७७ CCTV ची नजर; नवरात्रोत्सवासाठी महालक्ष्मी मंदिराची सज्जता