मनोरंजन

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता अडकणार विवाहबंधनात! फोटो शेअर करत दिला आनंदाचा धक्का!

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमातून प्रेक्षकांसमोर आलेल्या आणि आपल्या सहज अभिनयाने ओळख मिळवलेला अभिनेता निमिश कुलकर्णी आता वैयक्तिक आयुष्यात एका नव्या टप्प्यात प्रवेश करत आहे.

Mayuri Gawade

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा केवळ महाराष्ट्रापुरता सीमित न राहता, जगभरातील मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा कार्यक्रम ठरला आहे. या मंचामुळे अनेक नवोदित कलाकार प्रसिद्धीझोतात आले. याच लोकप्रिय कार्यक्रमातून प्रेक्षकांसमोर आलेल्या आणि आपल्या सहज अभिनयाने ओळख मिळवलेला अभिनेता निमिश कुलकर्णी आता वैयक्तिक आयुष्यात एका नव्या टप्प्यात प्रवेश करत आहे.

नुकताच त्याचा साखरपुडा पार पडला असून, लवकरच तो विवाहबंधनात अडकणार आहे. सोशल मीडियावर साखरपुड्याचे खास क्षण शेअर करत त्याने आपले मित्र, आणि चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे.

निमिश कुलकर्णीच्या आयुष्यात आलेली खास व्यक्ती कोमल भास्कर ही सुद्धा मराठी मनोरंजनसृष्टीत सक्रिय आहे. कोमल मराठी मालिकांमध्ये क्रिएटिव्ह हेड म्हणून काम करते.

नुकत्याच पार पडलेल्या त्यांच्या या खास क्षणाचे फोटो कोमलने तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सोबतच तिने कॅप्शनमध्ये "एक नवीन सुरुवात... आता आयुष्यभर आम्ही एकत्र असू..." असे लिहिले आहे. २५ जुलै २०२५ ही साखरपुड्याची तारीखही तिने कॅप्शनमध्ये नमूद केली आहे.

निमिशने या कार्यक्रमात पांढऱ्या रंगाची डिझायनर शेरवानी परिधान केली होती, तर कोमलने जांभळ्या रंगाची साडी नेसून सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. दोघांनी हातातील अंगठ्या दाखवत खास फोटोशूटही केलं.

हास्यजत्रेसोबतच विविध मालिकांमधून प्रेक्षकांच्या घराघरांत पोहोचलेला निमिश, आता वैयक्तिक आयुष्यातही नव्या भूमिकेसाठी सज्ज झालाय. लग्नाची तारीख अजून जाहीर झालेली नसली, तरी ही जोडी पाहून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव सुरु झालाय!

महाराष्ट्र प्रशासनात मोठा बदल; राजेश अग्रवाल यांची मुख्य सचिवपदी नियुक्ती

निवडणुका होणारच, पण...; सर्वोच्च न्यायालयाचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर मोठा निर्णय

२ डिसेंबरच्या निवडणुकांसाठी सरकारचा निर्देश : मतदारांना भरपगारी रजा द्या, अन्यथा ...

Mumbai : बांधकाम प्रदूषणावर हायकोर्टाची कठोर भूमिका; नियमांच्या अंमलबजावणीसाठी नेमली ५ सदस्यांची समिती

"सीझन २ - पुन्हा मुलगी!" मराठी अभिनेता दुसऱ्यांदा झाला बाबा; सोशल मीडियावर खास पोस्टसोबत दिली गुड न्यूज