मनोरंजन

"माझी कोथिंबीर वडी” प्राजक्ताच्या शेतातल्या व्हिडीओवर चाहत्यांनी केला कमेंट्सचा वर्षाव

प्राजक्ताने आपल्या चाहत्यासांठी नवा व्हिडीओ शेअर केला आहे. प्राजक्ताच्या या व्हिडीओने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Swapnil S

‘स्वराज्य रक्षक संभाजी’मधून घराघरांत पोहचलेली मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. निरनिराळे फोटो व व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांना अपडेट देत असते. सध्या प्राजक्ता आजीच्या गावी गेली असून तिने आपल्या चाहत्यासांठी मस्त कॅप्शन देत गावाकडचा खास व्हिडीओ शेअर केला आहे.

प्राजक्ताच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या व्हिडीओमध्ये ती शेतातील कोथिंबीर काढताना दिसतेय. प्राजक्ता शेतकरी कुटुंबातली आहे, त्यामुळे ती गावाकडचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांना माहिती देत असते. आता या नव्या व्हिडीओमध्ये प्राजक्ताने आपल्या शेताची झलक दाखवली आहे.

प्राजक्ताने व्हिडीओ शेअर करत लिहिले, “त्याचं झालं असं, आजी म्हणाली कोथिंबिरीच्या वड्या करुयात, मग म्हटलं आणूयात कोथिंबीर शेतात जाऊन”, अशी कॅप्शन तिने दिली आहे. अनेक चाहत्यांनी या पोस्टवर कमेंट केल्या आहेत. "माझी कोथिंबीर वडी” अशी कमेंट एकाने केली आहे, तर दुसऱ्याने कमेंट करत “तुमच्या शेतातले बंधारे अद्यापही शाबुत आहेत” अशी मिश्कील कमेंट केली आहे. प्राजक्ताच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे. प्राजक्ताचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

प्राजक्ता अभिनेते अमोल कोल्हे यांच्या ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्यामध्ये झळकली आहे. तिने आतापर्यंत अनेक मराठी चित्रपटांमध्येही काम केले आहे. लवकरच ती एका दाक्षिणात्य चित्रपटातही झळकणार आहे.

माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट: HC कडूनही झटका; तातडीने सुनावणी घेण्यास नकार, कधीही होऊ शकते अटक

दादर स्थानकात बदलापूर-CSMT एसी लोकलचे दरवाजेच उघडले नाही; प्रवाशांचा संताप, मोटरमनला जाब - Video व्हायरल

मी माफी का मागू?... ‘ऑपरेशन सिंदूर’बाबतच्या 'त्या' वक्तव्यावर पृथ्वीराज चव्हाण यांचा माफी मागण्यास नकार

शिल्पा शेट्टी-राज कुंद्राच्या अडचणी वाढल्या; ६० कोटींच्या फसवणूक प्रकरणात EOW कडून मोठा धक्का

Ambernath : भाजप उमेदवारांच्या कार्यालयावर गोळीबार; परिसरात तणाव, सुरक्षा रक्षक जखमी - CCTV व्हिडिओ समोर