मनोरंजन

मराठी कलाकारांचा शिवसेनेत प्रवेश

गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर शिव चित्रपट सेनेच्या नवीन लोगोचं अनावरण

नवशक्ती Web Desk

राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त ठाण्यातील आनंदाश्रम येथे उपस्थित राहून वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेब आणि वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्रपणे अभिवादन केले. गुरुपौर्णिमेच्या या शुभमुहूर्तावर आज माजी आमदार शिशिर शिंदे यांच्यासह त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी तसेच अभिनय क्षेत्रातील मराठी कलावंतांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या सर्वांचे पक्षात स्वागत करून मुख्यमंत्री महोदयांनी त्यांना त्यांच्या भावी सामजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

राज्याचे मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे यांच्या उपस्थितीत काही मराठी कलाकारांनी गुरुपौर्णिमेचा मुहूर्त साधत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते शिवचित्रपट सेनेच्या नवीन लोगोचे अनावरण करण्यात आले.माधव देवचाके, हार्दिक जोशी, आदिती सारंगधर, अमोल नाईक, प्रतीक पाटील या मराठी कलाकारांनी शिवसेनेत प्रवेश केला.

यावेळी शिवसेना ही कामयच मराठी कलाकारांच्या पाठीशी ठामपणे उभी असून चित्रपट क्षेत्रातील कलाकार आणि काम करणारे तंत्रज्ञ यांचे प्रश्न मार्गी लागावेत यासाठीच शिवसेना चित्रपट सेनेची स्थापना करण्यात आली असून, चित्रपट सृष्टीतील कामगार, तंत्रज्ञ, यांचेही प्रश्न सुटावेत अशी अपेक्षा यावेळी बोलताना व्यक्त केली.

यावेळी शिवसेना सचिव सुशांत शेलार, चित्रपट सेनेच्या पदाधिकारी शर्मिष्ठा राऊत, खासदार राहुल शेवाळे , आमदार प्रकाश सुर्वे हे यावेळी उपस्थित होते.

इस्रोच्या PSLV-C62 मोहिमेला धक्का; प्रक्षेपणानंतर रॉकेटवरील नियंत्रण सुटले, १६ उपग्रह अंतराळात हरपले

Payal Gaming MMS Case : महाराष्ट्र सायबरची डीपफेक क्लीप अपलोड करणाऱ्यांवर कारवाई, आरोपींनी जाहीर माफीही मागितली - Video

४ दिवसांपूर्वीच जामिनावर सुटून घरी आला आणि… ; परभणी संविधान शिल्प विटंबना प्रकरणातील आरोपी दत्ता पवारची आत्महत्या

Thane Traffic Update : राज ठाकरे-उद्धव ठाकरेंच्या संयुक्त सभेमुळे आज वाहतुकीत मोठे बदल; जाणून घ्या पर्यायी मार्ग

डोनाल्ड ट्रम्प 'व्हेनेझुएलाचे कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष'; स्वतःच केले जाहीर; ट्रुथ सोशलवरील पोस्टने खळबळ