मनोरंजन

पुन्हा एकदा भीतीचा थरार घडणार 'अल्याड पल्याड २’ येणार

‘अल्याड पल्याड’ वर भरभरून प्रेम केले. याच प्रेमामुळे निर्माते शैलेश जैन, महेश निंबाळकर व दिग्दर्शक प्रीतम एसके पाटील ‘अल्याड पल्याड २’ आपल्या भेटीला घेऊन येणार आहेत.

Tejashree Gaikwad

‘अल्याड पल्याड’ या चित्रपटाने बॅाक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. लेखन-दिग्दर्शनापासून संवाद, अभिनय, सादरीकरण, गीत-संगीत या सर्वांवर प्रेक्षक अक्षरश: फिदा झाले आहेत. त्यामुळेच प्रेक्षकांनी ‘अल्याड पल्याड’ वर भरभरून प्रेम केले. याच प्रेमामुळे निर्माते शैलेश जैन, महेश निंबाळकर व दिग्दर्शक प्रीतम एसके पाटील ‘अल्याड पल्याड २’ आपल्या भेटीला घेऊन येणार आहेत. आजच या चित्रपटाचे पोस्टर सोशल माध्यमावर पोस्ट करत 'अल्याड पल्याड’ चा सिक्वेल अर्थात 'अल्याड पल्याड २’ ची घोषणा करण्यात आली आहे.

'अल्याड पल्याड’ चित्रपटात

भयासोबत विनोदाची सुद्धा किनार होती. भयाबरोबरच विनोदाचीसुद्धा योग्य सांगड घातली गेल्याने प्रेक्षकांनीही चित्रपटाला उत्तम प्रतिसाद दिला. 'आमचा पहिला चित्रपट लोकांना इतका आवडलाय आणि त्याच्या दुसऱ्या भागाची उत्सुकता आहे याचं आम्हाला खरंच खूप छान वाटतेय, अशा भावना कलाकारांनी व्यक्त केल्या. मकरंद देशपांडे, गौरव मोरे, संदीप पाठक,सक्षम कुलकर्णी, सुरेश विश्वकर्मा,चिन्मय उदगीरकर, भाग्यमजैन,अनुष्का पिंपुटकर आदि कलाकारांच्या भूमिका ‘अल्याड पल्याड' चित्रपटात आहेत.

दर्जेदार कलाकृतीचा निर्माता म्हणून मिळणारे समाधान आमच्यासाठी महत्त्वपूर्ण असून नवनवीन विषय घेऊन येण्याची मराठीची क्षमता बघूनच मराठीच्या प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आम्ही पुढाकार घेतल्याचे निर्माते शैलेश जैन आणि महेश निंबाळकर सांगतात. ‘अल्याड पल्याड’ चा सिक्वेल ही रसिकांना मनोरंजनाचा नक्कीच आनंद देईल, असा विश्वास दिग्दर्शक प्रीतम एसके पाटील यांनी व्यक्त केला.

भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर परतले; चारही अंतराळवीरांसह कॅलिफोर्नियातील समुद्रात लँडिंग,भारतासाठी अभिमानाचा क्षण

गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवासी जेट्टीला परवानगी; परिसरात सुविधा पुरवताना खबरदारी घेण्याचे हायकोर्टाचे सरकारला निर्देश

कबुतरखाने तोडण्यास तात्पुरती मनाई; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

गणेशोत्सवासाठी एसटीच्या ५ हजार जादा बसेस; कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा

अखेर जयंत पाटलांचा राजीनामा; शशिकांत शिंदेंकडे प्रदेशाध्यक्षपदाची धुरा