मनोरंजन

मालिका आणि चित्रपट यांची तुलना नको; मोती सागर यांचे मत

नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ चित्रपटातील प्रभू श्रीरामाच्या रूपातील रणबीर कपूरच्या पहिल्या लूकला रामानंद सागर यांचे पुत्र मोती सागर यांनी पसंती दर्शवली आहे. १९८७ ची रामायण ही प्रसिद्ध टीव्ही मालिका आणि आगामी चित्रपट यांची तुलना करणे त्यांनी चुकीचे ठरवले आहे. या दोन्ही माध्यमांचे स्वरूप पूर्णपणे वेगळे आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.

Swapnil S

मुंबई : नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ चित्रपटातील प्रभू श्रीरामाच्या रूपातील रणबीर कपूरच्या पहिल्या लूकला रामानंद सागर यांचे पुत्र मोती सागर यांनी पसंती दर्शवली आहे. १९८७ ची रामायण ही प्रसिद्ध टीव्ही मालिका आणि आगामी चित्रपट यांची तुलना करणे त्यांनी चुकीचे ठरवले आहे. या दोन्ही माध्यमांचे स्वरूप पूर्णपणे वेगळे आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.

हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर गेल्या आठवड्यात या चित्रपटाचा पहिला टीझर प्रदर्शित झाला, ज्यातून प्रेक्षकांना या भव्य चित्रपटाच्या जगाची आणि रणबीर कपूरच्या ‘राम’ रूपाची झलक पाहायला मिळाली.

मोती सागर ‘पीटीआय’शी बोलताना म्हणाल की, ‘लोक अनेकदा विसरतात की आमची मालिका ७८ भागांची होती आणि प्रत्येक भाग ३०-४० मिनिटांचा होता. याउलट, चित्रपट केवळ तीन ते चार तासांचा असेल.

त्यामुळे खूप फरक असणारच,’ असे त्यांनी स्पष्ट केले. ‘रामायण’चा पहिला भाग दिवाळी २०२६ मध्ये आणि दुसरा भाग दिवाळी २०२७ मध्ये प्रदर्शित होणार आहे. त्याकाळी प्रत्येक भागासाठी ९ लाख रुपये खर्च येत असे.

रामायण तेव्हा आणि आता

त्याकाळी ग्राफिक्स उपलब्ध नसल्यामुळे विशेष दृश्ये तयार करण्यासाठी त्यांनी अनेक 'जुगाड' केले होते. उदाहरणार्थ, धुके निर्माण करण्यासाठी अगरबत्ती आणि धूपाचा वापर केला जाई. तर धनुष्यबाणांच्या दृश्यांसाठी विशेष यंत्र वापरले होते. आता तंत्रात खूपच फरक पडला आहे.

CJP Protest : 'त्या' आंदोलकांची सुटका करा; सर्वोच्च न्यायालयाचे महाराष्ट्रासह ७ राज्यांना आदेश

'चुकून व्हिडिओ हटवला'; पंतप्रधान मोदींच्या फेसबुक पोस्टप्रकरणी Meta ची माफी

जपानमध्ये ७.१ तीव्रतेचा भूकंप; त्सुनामीचा इशारा, हादरवणारे Video व्हायरल

पत्नीचा जीव जात असताना मोबाईलमध्ये VIDEO शूट; पतीच्या कृत्याने पोलिसही हादरले

आरक्षणाच्या व्हायरल पोस्टवर शिल्पा शेट्टीचा संताप; म्हणाली - "माझ्या नावाने खोटी माहिती पसरवली...