ANI
मनोरंजन

मुंबई पोलिसांचे पथक सलमान खानच्या घरी ; काय आहे प्रकरण ?

पंजाबी रॅपर आणि गायक सिद्धू मुसेवालाच्या मृत्यूनंतर गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या गुंडांनी सलमानला जीवे मारण्याची धमकी

वृत्तसंस्था

मुंबई पोलिसांचे एक पथक आज अभिनेता सलमान खानच्या घरी पोहोचले. त्यांनी सलमानच्या घराचा आढावा घेतला आहे. मात्र ही नित्याची प्रक्रिया असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर पोलीस तेथून निघून गेल्याचे सांगण्यात येत आहे. पंजाबी रॅपर आणि गायक सिद्धू मुसेवालाच्या मृत्यूनंतर गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या गुंडांनी सलमानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. मुंबई पोलिसांचे एक पथक लवकरच पंजाबला जाणार आहे.

काय आहे प्रकरण ?

सलमान खानचे वडील सलीम खान यांना काही दिवसांपूर्वी सकाळी धमकीचे पत्र आले होते. त्यामध्ये मी तुझा ही सिद्धू मुसेवेला करेन, अशी धमकी लिहिली होती. या पत्रानंतर सलमान आणि त्याच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आली होती. सलमानच्या घराची झडती घेणाऱ्या कपिल पंडितला नुकतीच मुंबई पोलिसांनी अटक केली. पोलीस आता त्याची चौकशी करत आहेत. याबाबत माहिती देताना पंजाब पोलिसांचे डीजीपी गौरव यादव म्हणाले, "चौकशीदरम्यान कपिल पंडितने कबूल केले आहे की, सचिन बिश्नोई आणि संतोष यादव यांच्यासोबत त्याने मुंबईत सलमानच्या घरी जाऊन लॉरेन्स बिश्नोईच्या सांगण्यावरून रेकी केली होती. गोल्डी ब्रार हा सलमानच्या घरी गेला होता. या प्रकरणामागे मास्टरमाईंड आहे.”

२२ सप्टेंबरपासून नवे GST दर लागू; कोणत्या वस्तू स्वस्त, तर कोणत्या राहणार स्थिर? वाचा सविस्तर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! नवी झळाळी घेऊन येतेय 'मोनोरेल'; पाहा काय आहेत नवे बदल?

UPSC उमेदवार पडताळणीसाठी AI ची मदत घेणार

Mumbai-Ahmedabad Bullet Train Project : बुलेट ट्रेन प्रकल्पाला वेग; घणसोली-शीळफाटा दरम्यान पाच किमीचा बोगदा पूर्ण

Kalyan-Dombivli : रहिवाशांची फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई - शिंदे