मनोरंजन

"मतदान म्हणजे अस्तित्वाची खूण…" पुणे-मुंबई प्रवास करत नाना पाटेकर मतदानासाठी आले; 'या' मराठी कलाकारांनीही केले मतदान; बघा Photo's

आज महानगरपालिका निवडणुकांसाठी मतदानाची प्रक्रिया सुरू असताना, शहरात लोकशाहीचा उत्साह पाहायला मिळत आहे. सकाळपासून विविध मतदान केंद्रांवर नागरिकांसह सेलेब्रिटीही मतदानासाठी पोहोचले. अशाच वातावरणात ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी पुण्याहून मुंबईपर्यंत प्रवास करत मतदानाचा हक्क बजावला.

Mayuri Gawade

आज महानगरपालिका निवडणुकांसाठी मतदानाची प्रक्रिया सुरू असताना, शहरात लोकशाहीचा उत्साह पाहायला मिळत आहे. सकाळपासून विविध मतदान केंद्रांवर नागरिकांसह सेलेब्रिटीही मतदानासाठी पोहोचले. अशाच वातावरणात ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी पुण्याहून मुंबईपर्यंत प्रवास करत मतदानाचा हक्क बजावला.

मतदान म्हणजे केवळ अधिकार नाही, तर स्वतःच्या अस्तित्वाची खूण आहे, असा ठाम विश्वास व्यक्त करत ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी पुण्याहून मुंबईपर्यंत ३ ते ४ तासांचा प्रवास करत मतदानाचा हक्क बजावला. ते म्हणाले, "मी मतदान मुंबईत करतो. सध्या मी पुण्यात राहतो. आज सकाळी ६ वाजता निघालो, इथे आलो आणि मतदान केलं. मला असं वाटतं की मतदान करणं म्हणजे आपल्या अस्तित्वाची खूण आहे आणि ते प्रत्येकाने जाणीवपूर्वक केलं पाहिजे. जो उमेदवार योग्य वाटेल त्यालाच मत द्या, पण घराबाहेर जरूर पडा. सुट्टी आहे म्हणून घराबाहेर राहू नका.. कृपया बाहेर पडा आणि मतदान करा.

नाना पाटेकरांसह अनेक मराठी कलाकारांनीही आज मतदान केंद्रावर हजेरी लावत नागरिक म्हणून आपली जबाबदारी पार पाडली.

अभिनेत्री प्राजक्ता माळीने ठराविक वेळेत मतदान केंद्र गाठून नागरिक म्हणून आपला कर्तव्य बजावला. तसेच अभिनेत्री संस्कृती बालगुडेनेदेखील मतदान केले.
अभिनेता सुबोध भावे आणि पत्नी मंजिरी भावे तसेच अभिनेता मिलिंद गवळी आणि पत्नी दीपा गवळी यांनीही मतदानाचे अधिकार बजावले.
हेमंत ढोमे आणि क्षिति जोग तर अभिनेत्री किशोरी शहाणे कुटुंबासोबत मतदान केंद्रावर पोहोचले आणि जनतेला मतदानाचे महत्त्व सांगितले.
अभिनेत्री भार्गवी चिरमुले आणि अभिनेत्री जान्हवी किल्लेकर यांनी उत्साहाने मतदान करुन आपल्या अधिकाराची जाणीव दाखवली.
प्रथमेश परब आणि आरोह वेलणकर यांनीही नागरिक म्हणून आपल्या मताचा उपयोग केला.

BMC Election : आज मतदान; मुंबईच केंद्रस्थानी; बोटावर उमटणार लोकशाहीचा ठसा, तरुणाईमध्ये उत्साहाचे वातावरण

मतदानानंतर लगेच पुसली जाते बोटावरची शाई; मनसेच्या महिला उमेदवाराचा दावा; काँग्रेसच्या सचिन सावंतांनी तर प्रात्यक्षिकच दाखवलं - Video

BMC Elections 2026: 'व्होटर स्लिप्स'चा गोंधळ; अनेक मतदार मतदान न करताच परतले

Thane Election : व्होटर स्लिपमध्ये घोळ; नाव, अनुक्रमांक बरोबर; पत्ते मात्र बदलले

BMC Elections 2026: मुंबईत मतदानाला झाली सुरूवात; आज काय सुरू, काय बंद?