आज(१७ ऑक्टोबर) ६९ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा पार पडला. राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते आज विजेत्यांचा सत्कार करण्यात आला. २४ ऑगस्ट रोजी या चित्रपटांची घोषणा करणयात आली होती. नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात हा पुरस्कार सोहळा पार पडला आहे. या पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूडसह दक्षिण भारतातील अनेक कलाकार सहभागी झाले होते.
अनेक मराठी कलाकारांनी देखील ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात नाव कोरलं आहे. 'एकदा काय झालं' या मराठी सिनेमाला सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. तर आलिया भट्ट आणि अभिनेत्री कृती सेननला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. याच बरोबर गोदावरीचे लेखक निखिल महाजन यांना उत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्यांची यादी-
- सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट - सरदार उधम सिंह
- सर्वोत्कृष्ट गुजराती चित्रपट - छेल्लो शो
- सर्वोत्कृष्ट कन्नड चित्रपट - 777 चार्ली
- सर्वोत्कृष्ट मैथिली चित्रपट - समांतर
- सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट - एकदा काय झालं
- सर्वोत्कृष्ट मल्याळम चित्रपट - होम
- सर्वोत्कृष्ट तमिळ चित्रपट - Kadaisi Vivasayi
- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - आलिया भट्ट (गंगुबाई काठियावाडी), कृती सॅनन (मिमी)
- सर्वोत्कृष्ट अभिनेता - अल्लू अर्जुन (पुष्पा द राइज)
- सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन - निखिल महाजन (गोदावरी - द होली वॉटर)
- विशेष ज्युरी पुरस्कार - शेरशाह
- राष्ट्रीय एकात्मतेवरील सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी - -
- सर्वोत्कृष्ट नर्गिस दत्त पुरस्कार - द काश्मीर फाइल्स
- सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म - रॉकेट्री: द नंबी इफेक्ट
- सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन - पुष्पा / आरआरआर
- सर्वोत्कृष्ट मेकअप आर्टिस्ट - गंगुबाई काठियावाडी
- सर्वोत्कृष्ट कॉस्च्युम डिझायनर - सरदार उधम सिंह
- सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझायनर - सरदार उधम सिंह
- सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझायनर - सरदार उधम सिंग
- सर्वोत्कृष्ट एडिटिंग - गंगुबाई काठियावाडी
सर्वोत्कृष्ट अॅक्शन डायरेक्टर पुरस्कार - RRR (स्टंट कोरिओग्राफर - किंग सॉलोमन)
- सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन - RRR (कोरियोग्राफर- प्रेम रक्षित)
- सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्ट्स - आरआरआर (स्पेशल इफेक्ट्स क्रिएटर - व्ही श्रीनिवास मोहन)
- सर्वोत्कृष्ट सिनेमेटोग्राफी- सरदार उधम सिंह
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - पल्लवी जोशी (द काश्मीर फाइल्स)
- सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - पंकज त्रिपाठी (मिमी)
- सर्वोत्कृष्ट बालकलाकार - भाविन रबारी
या सोहळ्यादरम्यान, केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले, राष्ट्रीय चित्रपट मिळण ही गर्वाची गोष्ट आहे. देशावर कोरोनाचं संकट असताना कलाकार मंडळींनी मनोरंजनाचं काम केलं आहे. तुमच्या सारखी कलाकार मंडळी प्रेक्षकांचं मनोरंजन करत आले आहेत. तुमचा कंटेट चांगला असेल तर तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. आंतराष्ट्रीय पातळीवर देखील तुम्लाहा चांगपी कामगिरी करता येईल.