मनोरंजन

हिंदी मराठी कलाविश्व गाजवणारी नेहा पेंडसे पोहोचली कान्स फेस्टिवलला; कातिल अदा पाहून चाहते फिदा!

कान्स डेब्यू करताना थोडी धाकधूक तर होती पण टेन्शन न घेता तिथल्या गोष्टी छान एन्जॉय करायच्या हेच ठरवून मी इकडे आली आहे

Swapnil S

मराठी सोबतीने हिंदी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे नेहा पेंडसे. अनेक गोष्टींमुळे विशेषतः तिच्या कमालीच्या फॅशन आणि ग्लॅमरस फोटोंमुळे ती कायम चर्चेत असते. आता नेहा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे आणि त्याचं कारण देखील तितकंच खास आहे.

मराठीबरोबरच नेहाने हिंदी कलाविश्वदेखील गाजवलं आहे. 'मे आय कम इन मॅडम?' या मालिकेमुळे तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली. पुढे नेहा पेंडसे 'भाभीजी घर पर है' मालिकेत अनिता भाभीच्या भूमिकेत पाहायला मिळाली होती आणि नेहा पेंडसे शेवटची जून या चित्रपटात झळकली होती. त्यानंतर नेहा काय नवीन भूमिका साकारणार, कोणत्या प्रोजेक्ट्समध्ये दिसणार यासाठी चाहते देखील तितकेच उत्सुक होते. पण, आता प्रतीक्षा संपली आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण, नेहाने सातासमुद्रापार असलेल्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये डेब्यू केला आहे.

कान्समधील नेहाचा रेड कार्पेट लूक आता समोर आला असून खास आऊटफिटमध्ये ती सुंदर दिसत आहे. नेहाचा हा पहिला कान्स लूक असून अजून दोन वेगवेगळ्या आणि तितक्याच आकर्षक लूक्समध्ये ती दिसणार आहे.

कान्स बद्दल बोलताना नेहा सांगते "प्रत्येक कलाकारांसाठी कान्समध्ये जाणं हे एक स्वप्नं असतं आणि माझ्यासाठी सुद्धा हा क्षण स्वप्नपूर्ती सारखा आहे. मला माझा लूक हा थोडा खास ठेवायचा होता पण सोबतीने तो कसा उठावदार आणि वेगळा दिसू शकतो याचा देखील मी विचार केला. मनीष घरतने हे सत्यात उतरवण्यासाठी माझी मदत केली आणि हा लूक उत्तम बनवला आहे. कान्ससाठीचा लूक हा मला शार्प आणि तितकाच ताकदीचा असावा असं वाटतं होतं. कान्स डेब्यू करताना थोडी धाकधूक तर होती पण टेन्शन न घेता तिथल्या गोष्टी छान एन्जॉय करायच्या हेच ठरवून मी इकडे आली आहे", असे ती म्हणाली.

मूळ मालकाला भरपाई दिल्याशिवाय प्रकल्पाग्रस्तांना जमिनीचे वाटप अयोग्य; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

प्रल्हाद जोशी नवे केंद्रीय शिक्षणमंत्री; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर स्वीकारला पदभार

Mumbai : शिवाजी पार्कवर तरुणाईचा महासागर! ठाकरे बंधूंच्या विजय जल्लोष सभेला हजारोंची उपस्थिती; VIDEO

'ही केवळ सुरुवात, अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे'; अभिजीत दिपकेंचा नवा व्हिडीओ चर्चेत

युनेस्कोकडून सारनाथला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा; भारताच्या सांस्कृतिक वैभवात मानाचा तुरा, जाणून घ्या इतिहास अन् वैशिष्ट्ये