X- @iamsrk, @ajaydevgn, @iTIGERSHROFF
मनोरंजन

जाहिरातप्रकरणी शाहरूखसह अजय देवगण आणि टायगर श्रॉफला नोटीस

जयपूर : पानमसाला ब्रँड ‘विमल’च्या जाहिरातप्रकरणी सुपरस्टार शाहरूख खान, अभिनेता अजय देवगण आणि टायगर श्रॉफला नोटीस जारी करण्याचे आदेश जयपूरच्या ग्राहक तक्रार निवारण मंचाने दिले आहेत. योगेंद्र सिंह यांनी केलेल्या तक्रारीनंतर मंचाचे अध्यक्ष ग्यारसीलाल मीना आणि सदस्य हेमलता अग्रवाल यांनी बॉलिवूडच्या या कलाकारांना नोटीस जारी करण्यास सांगितले. पानमसाल्याची जाहिरात फसवणूक करणारी आहे.

Swapnil S

जयपूर : पानमसाला ब्रँड ‘विमल’च्या जाहिरातप्रकरणी सुपरस्टार शाहरूख खान, अभिनेता अजय देवगण आणि टायगर श्रॉफला नोटीस जारी करण्याचे आदेश जयपूरच्या ग्राहक तक्रार निवारण मंचाने दिले आहेत. योगेंद्र सिंह यांनी केलेल्या तक्रारीनंतर मंचाचे अध्यक्ष ग्यारसीलाल मीना आणि सदस्य हेमलता अग्रवाल यांनी बॉलिवूडच्या या कलाकारांना नोटीस जारी करण्यास सांगितले. पानमसाल्याची जाहिरात फसवणूक करणारी आहे. पानमसाल्याच्या प्रत्येक दाण्यात केसर असल्याचा दावा केला आहे. पानमसाल्यात केसर असल्याचा दावा करून ते खोटा प्रचार करत असल्याचा आरोप योगेंद्र सिंह यांनी केला. या फसव्या जाहिरातीवर बंदी घालण्याची मागणी त्यांनी केली.

‘बोलो जुबां केसरी’ या टॅगलाइनची ही जाहिरात आहे. त्यात दावा केला की, पानमसाल्यात केसर आहे. हे पॅकेट उघडताच त्यातून केसर निघते. या जाहिरातीत शाहरूख खान, अजय देवगण व टायगर श्रॉफ दिसतात. या जाहिरातीवरून वाद झाल्यानंतर त्यांनी यातून अंग काढून घेतले. विमल इलायचीचा अक्षय कुमार हा ब्रँड ॲॅम्बेसिडर होता. सोशल मीडियावरून टीका झाल्यानंतर अक्षय कुमारने माफी मागून त्याने ब्रँड ॲॅम्बेसिडरपदाचा राजीनामा दिला. मी तंबाखूचे समर्थन करत नाही, तसेच त्याची जाहिरात स्वीकारत नाही, असे अक्षय कुमारने सांगितले होते.

फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी मोठी अपडेट; निलंबित PSI गोपाळ बदने अखेर पोलिसांना शरण

कूपर रुग्णालयात 'फायर सेफ्टी बॉल' बसवणार; आग प्रतिबंधक तयारी अधिक मजबूत होणार

छठ पूजेमुळे 3 हजार कोटींची उलाढाल; BMC सज्ज

उलवेमध्ये घर खरेदीदारांची फसवणूक प्रकरण : विकासक गोराडिया दाम्पत्याला जामीन मंजूर

स्लीपर बसमधून प्रवास करताय हे लक्षात ठेवा; एसटीची सुरक्षा जनजागृती मोहीम सुरु