मनोरंजन

आता होणार सेलिब्रिटींचे लग्न जोरात...

प्रतिनिधी

झी मराठीवरील सगळेच कार्यक्रम प्रेक्षकांच्या आवडीचे असतात. वेगळा विषय घेऊन झी मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन करते. सध्या सुरु असलेला बँड बाजा वरात या कार्यक्रमाने अनेक नवं दाम्पत्यांना आहेर देऊन त्यांच्या आयुष्यातील सगळ्यात महत्वाचा दिवस अजून खास बनवला आहे. आता या नवीन पर्वात प्रेक्षकांचे लाडके सेलिब्रिटी जोडपी सहभागी होणार आहेत. आपण नेहमी कलाकारांच्या लग्नाचा थाट फोटोज मधून पाहतो पण जर प्रत्यक्षात जर आपल्याला एका सेलिब्रिटी जोडप्याचं लग्न पाहायला मिळाणार आहे. हो बँड बाजा वरात या कार्यक्रमामध्ये सेलिब्रिटींच लग्न जोरात हा नवीन सेगमेंट येणार आहे.

या कार्यक्रमाच्या प्रोमोमध्ये जेव्हा मृण्मयी देशपांडे 'का सांगू मी अशोक मामा कोणाशी लग्न करत आहेत?' ते ऐकून सर्व प्रेक्षक गोंधळात पडले होते. या कार्यक्रमात प्रेक्षकांना कलाकारांच्या लग्नाची गंमत पहायला मिळणार असून अभिनेत्री मृण्मयी देशपांडे या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातुन मृण्मयी देशपांडेचे पुन्हा एकदा सुत्रसंचालन पाहायला मिळणार आहे. या कार्यक्रमातून प्रेक्षकांना प्रत्येक आठवड्यात सेलिब्रिटीजच्या लग्नाचा थाट, त्यांचा आता पर्यंतचा प्रवास त्यातील गमती-जमती पाहायला मिळणार आहेत. प्रेक्षकांना पुन्हा एकदा एक वेगळा धाटणीचा विषय झी मराठीवर दिसणार आहे.

प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी

प्रेक्षकांप्रमाणेच सेलिब्रिटी या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी उत्सुक आहेत. त्यांना देखील त्यांच्या लग्नातील काही खास क्षण पुन्हा एकदा जगायला मिळतील. या आठवड्यात प्रेक्षकांना अभिनेता भारत गणेशपुरे व त्यांच्या सौ आणि अभिनेत्री किशोरी शहाणे वीज आणि त्यांचे पती दीपक बलराज वीज यांच्या लग्नाची धूम पाहायला मिळणार आहे. या कार्यक्रमाची सगळी धमाल मजा मस्ती प्रेक्षकांना १७ जून पासून रात्री ९.३० वाजता झी मराठीवर पाहायला मिळेल. तसेच हा कार्यक्रम प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी ठरणार आहे.

पाचव्या टप्प्यातील प्रचार संपला; अखेरच्या क्षणी मतदार भेटीसाठी सर्वपक्षीय लगबग

मुंबई: धरणांतील जलसाठा घटला; १५ जुलैपर्यंत तहान भागेल इतकाच पाणीसाठा

World Bee Day 2024: जागतिक मधमाशी दिन,का साजरा केला जातो हा दिवस? जाणून घ्या महत्त्व

आम्ही भाजप मुख्यालयात येतो, अटक कराच! अरविंद केजरीवाल यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट आ‌व्हान

Marathi Serial: लोकप्रिय मालिका 'बाळुमामाच्या नावानं चांगभलं' प्रेक्षकांपुढे येणार नवीन अवतारात!