ज्येष्ठ नाट्य अभिनेते, गायक प्रसाद सावकार कालवश 
मनोरंजन

ज्येष्ठ नाट्य अभिनेते, गायक प्रसाद सावकार कालवश

मराठी संगीत रंगभूमी, नाट्यक्षेत्र आणि शास्त्रीय संगीतविश्वातील ज्येष्ठ गायक-नट, नाट्यकर्मी आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित प्रसाद सावकार यांचे बुधवारी जूनला निधन झाले.

Swapnil S

पणजी : मराठी संगीत रंगभूमी, नाट्यक्षेत्र आणि शास्त्रीय संगीतविश्वातील ज्येष्ठ गायक-नट, नाट्यकर्मी आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित प्रसाद सावकार यांचे बुधवारी जूनला निधन झाले.

वयाच्या ९८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पणजी येथील टोका करंजाळे परिसरातील त्यांच्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने मराठी संगीत नाटकाच्या सुवर्णयुगाचा अंत झाल्याची भावना व्यक्त होत आहे. प्रसाद सावकार यांच्या पार्थिवावर गुरुवारी १८ जूनला सकाळी १०.३० वाजता पणजी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

पद्मश्री पुरस्काराने सन्मानित

नाट्यक्षेत्रातील योगदानासाठी भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते. याशिवाय बालगंधर्व सुवर्णपदक, दीनानाथ मंगेशकर पुरस्कार, लता मंगेशकर पुरस्कार, गोवा शासनाचा कलावंत पुरस्कार यांसह अनेक प्रतिष्ठित सन्मान त्यांना प्राप्त झाले. प्रसाद सावकार यांच्या निधनाने मराठी संगीत रंगभूमीतील एक अजरामर स्वर कायमचा शांत झाला असला, तरी त्यांनी अजरामर केलेली नाट्यपदे, भूमिका आणि कलाविष्कार रसिकांच्या स्मरणात सदैव जिवंत राहतील.

Mumbai : गणेशमूर्तींच्या उंचीची स्पर्धा अयोग्य; डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे ध्वनिप्रदूषण, उपमहापौर संजय घाडी यांचे आवाहन

Ganeshotsav 2026 : अनंत चतुर्दशीला पश्चिम रेल्वेकडून रात्री उशिरापर्यंत लोकल सेवा; चर्चगेट-विरारदरम्यान १२ विशेष फेऱ्या, जाणून घ्या वेळापत्रक

‘वन नेशन, वन ई-चलान’ प्रकल्पाला मान्यता; वाहतूक नियमभंगावर प्रभावी कारवाईसाठी प्रकल्प

दिल्ली हादरली! मित्राला भेटायला गेली अन्...; १७ वर्षीय मुलीची सामूहिक अत्याचारानंतर निर्घृण हत्या, चौघे पोलिसांच्या ताब्यात

ठाणे पालिका अतिरिक्त आयुक्तांचा ‘दर्जा’ बदलला! प्रशांत रोडे अतिरिक्त आयुक्त-१, डॉ. नितीन राठोड अतिरिक्त आयुक्त-२