@primevideoin / Instagram
मनोरंजन

Panchayat Season 3: 'पंचायत सीझन ३'चा धमाकेदार ट्रेलर रिलीज, 'या' दिवसापासून बघायला मिळेल वेब सीरिज

Tejashree Gaikwad

Panchayat Season 3 Release Date: बहुप्रतिक्षित कॉमेडी-ड्रामा वेब सिरीज 'पंचायत सीझन ३' चा धमकदार ट्रेलर रिलीज झाला आहे. ८ एपिसोडसह ही फुलेरातील ग्रामीण जीवनातील आणखी एक हटके कथा घेऊन पंचायत येत आहे. अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओने आज १५ मे रोजी ट्रेलर रिलीज केला आहे. यामध्ये परिचित पात्रांना नवीन आव्हाने आणि संघर्षांचा कसा सामना करावा लागतो हे बघायला मिळेल. याशिवाय प्रेम, मैत्री आणि अशा अनेक गोष्टी बघायला मिळणार आहेत. द व्हायरल फीव्हरच्या या वेब सीरिजचे दिग्दर्शन दीपक कुमार मिश्रा यांनी केले आहे. त्याचे लेखक चंदन कुमार आहेत. यावेळीही जितेंद्र कुमार, नीना गुप्ता, रघुबीर यादव, फैसल मलिक, चंदन रॉय आणि सान्विका हे कलाकार आपल्या दमदार अभिनयाने आपलं मनोरंजन करायला सज्ज झाले आहेत. ट्रेलरमध्ये बघायला मिळत आहे की अभिषेक (जितेंद्र कुमार) पंचायतमधील सचिवाच्या भूमिकेत परत आला आहे.

कधी आहे प्रीमियर?

पंचायत सीझन ३ चं प्रीमियर २८ मे रोजी हिंदी, तमिळ, तेलुगु, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर होईल. जगभरातील २४० देशामध्येही ही वेब सिरीज प्रसारित होणार आहे. पंचायत सीझन ३ चा ट्रेलर या आधी १७ मे रोजी रिलीज होणार होता, परंतु प्रेक्षकांमधील वाढती उत्सुकता पाहून निर्मात्यांनी आजच तो रिलीज केला.

ट्रेलर रिलीजच्या एक दिवसापूर्वी निर्मात्यांनी चाहत्यांना एक हटके खेळ खेळवला होता. या खेळाची काही युजर्सने मज्जा घेतली तर काहींची मात्र चिडचिड झाली. पण आता रिलीज डेट जाहीर झाल्यानंतर चाहत्यांकडून भरभरून प्रतिक्रिया येत आहेत. एकाने लिहिले की, 'नॉनसेन्स प्रमोशननंतर अखेर रिलीज डेट समोर आली आहे.' दुसऱ्याने कमेंट केली, 'बघतोयस का बिनोद, रिलीज डेट कशी सांगितली जात आहे.'

याच दरम्यान काही लोक 'मिर्झापूर ३'ची रिलीज डेट जाहीर करण्याची विनंतीही करत आहेत.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस