मनोरंजन

पंकज त्रिपाठी नाही आता निवडणूक आयोगाचे 'नॅशनल आयकॉन'; स्वतःहून सोडले पद, 'हे' आहे कारण

"आगामी चित्रपटात राजकीय नेत्यांची भूमिका स्वीकारल्याने पंकज त्रिपाठी यांनी सामंजस्य करारातील अटींनुसार स्वत:हून आपले पद सोडले आहे", असे निवडणूक आयोगाने म्हटले.

Rakesh Mali

हरहुन्नरी अभिनेता पंकज त्रिपाठी यांच्याविषयी मोठी बातमी समोर आली आहे. ते भारतीय निवडणूक आयोगाच्या 'नॅशनल आयकॉन' पदावरून पायउतार झाले आहेत आहे. त्यांनी त्यांच्या स्वेच्छेने पद सोडल्याचे आयोगाकडून सांगण्यात आले आहे.

निवडणूक आयोगाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर याबाबतची माहिती दिली आहे. "आगामी चित्रपटात राजकीय नेत्यांची भूमिका स्वीकारल्याने पंकज त्रिपाठी यांनी सामंजस्य करारातील अटींनुसार स्वत:हून आपले पद सोडले आहे", असे निवडणूक आयोगाने म्हटले.

ऑक्टोबर 2022मध्ये झाली होती नियुक्ती-

नागरिकांमध्ये मतदानाबाबत जागरुकता यावी यासाठी निवडणूक आयोगाकडून प्रसिद्ध सिने-सेलिब्रिटींना राष्ट्रीय आयकॉन म्हणून नियुक्त केले जाते. पंकज त्रिपाठी यांची ऑक्टोबर 2022 मध्ये नॅशनल आयकॉन म्हणून निवड करण्यात आली होती.

‘मैं अटल हूं’मुळे राजीनामा-

निवडणूक आयोगाचे केलेल्या ट्विटवरुन ‘मैं अटल हूं’ या त्यांच्या आगामी चित्रपटामुळे त्यांनी हे पद सोडल्याचे बोलले जात आहे. सध्या ते त्यांच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात ते माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित हा सिनेमा आहे.

रवी जाधवचे आहे दिग्दर्शन, कधी प्रदर्शित होणार?

पंकज त्रिपाठी यांचा ‘मैं अटल हूं’ हा चित्रपट येत्या १९ जानेवारी रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाकडून प्रेक्षकांच्या मोठ्या अपेक्षा आहेत. निर्मात्यांनी बायोपिकची घोषणा केल्यापासून त्यांच्या चाहत्यांना खूप उत्सुकता होती. रवी जाधव यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे, तर कथा उत्कर्ष नैथनी यांनी लिहिली आहे. भानुशाली स्टुडिओ लिमिटेड आणि लिजेंड स्टुडिओज यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

महायुतीच ठरलं! स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मुंबईत युती तर अन्यत्र स्वबळावर लढण्याचे संकेत

आजचे राशिभविष्य, २३ ऑक्टोबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

लक्ष्मीपूजनाला वरुणराजाचे 'फटाके'! दिवाळीच्या धामधुमीत मुंबई, ठाणे, नवी मुंबईत अवकाळी पावसाचे धुमशान

दिवाळीच्या सणात पावसाची आतषबाजी; शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान

दिवाळीनिमित्त मोदींचे देशवासीयांना पत्र; स्वदेशी, भाषा, आरोग्य यासह ऑपरेशन सिंदूरचाही केला उल्लेख