Neha Kakkar Life Story: ऋषिकेशमधून येऊन मुंबईच्या चकचकीत शहरात आपलं नाव कमावलेल्या नेहा कक्करला आजकाल कोण ओळखत नाही. तिने आपल्या कौशल्याने मनोरंजन इंडस्ट्रीमध्ये खूप मोठे नाव कमावले आहे. आज ती ज्या शोची जज म्हणून बसली आहे तिथून तिला एकदा नाकारण्यात आले होते. यावरूनच समजते की नेहा कक्कर तिच्या उत्तम गायकीमुळे सेलिब्रिटी बनली पण तिचा हा प्रवास इतका सोपा नव्हता. आयुष्यात अनेक चढउतारांचा सामना करून ती इथपर्यंत पोहोचली आहे. आज म्हणजेच ६ जून रोजी नेहा कक्कर तिचा ३८ वा वाढदिवस साजरा करत आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त तिच्या संघर्षाची कहाणी सांगत आहोत जी अनेकांसाठी प्रेरणादायी ठरू शकते.
लहान वयातच घेतली कुटुंबाची जबाबदारी
६ जून १९८८ साली उत्तराखंडच्या ऋषिकेशमध्ये जन्मलेल्या नेहा कक्करची कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अतिशय वाईट होती. तिच्याकडे तिच्या वैयक्तिक गरजा पूर्ण करण्यासाठी पैसे नव्हते. तिचे बालपण अत्यंत गरिबीत गेले. एका मुलाखतीत नेहाने सांगितले होते की, तिचे वडील घरखर्च भागवण्यासाठी शाळेबाहेर समोसे विकायचे. या कारणामुळे शाळेतील मुले तिला चिडवायची. इतकंच नाही तर घरच्या गरजा भागवण्यासाठी नेहा लहानपणापासूनच वडिलांसोबत जगरतामध्ये गायला जात होती, जेणेकरून तिच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारावी. नेहा कक्करने लहान वयातच कुटुंबाची जबाबदारी घेण्यास सुरुवात केली.
आई-वडिलांना द्यायचा नव्हता जन्म
स्वत:चे नाव कमावणाऱ्या नेहा कक्करने तिच्या एका गाण्यात आयुष्यातील संघर्षाची कहाणी सांगितली आहे. २.५० मिनिटांच्या या गाण्यात नेहा सांगते की गरिबीमुळे तिचे आई-वडील तिला जन्म देऊ इच्छित नव्हते. परंतु गर्भधारणा ८ आठवडे असल्याने डॉक्टरांनी गर्भपात करण्यास नकार दिला.
सुरुवातीच्या काळात नेहाला स्टारडम सिंगिंग रिॲलिटी शो 'इंडियन आयडॉल' मधून मिळाले. याच शोमध्ये नेहा कक्करला एकदा नाकारण्यात आले होते. पण संघर्षाला कधीही हार न मानणारी नेहा आज या शोमध्ये जज म्हणून बसली आहे.