बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पक्षाचे नेते व राज्यसभा खासदार राघव चड्ढा लवकरच आई-बाबा होणार आहेत. नुकतंच परिणीतीनं सोशल मीडियावर चाहत्यांसोबत तिच्या आयुष्यातील हा आनंद शेअर केला. सप्टेंबर २०२३ मध्ये परिणीती आणि राघव लग्नबंधनात अडकले होते. लग्नानंतर दोन वर्षांनी या लोकप्रिय जोडप्याने आई-बाबा होण्याची गोड बातमी दिली आहे. परिणीतीनं यासंदर्भात सोशल मीडियावर एक क्युट पोस्टही शेअर केली आहे.
परिणीतीने इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे, ज्यात एक खास केक दिसत आहे. या केकवर चिमुकल्या पावलांच्या खुणा आहेत आणि त्यावर "1+1=3" असा संदेश लिहिलेला आहे. अशा हटके पद्धतीने परिणीतीनं चाहत्यांशी गूड न्यूज शेअर केली. पोस्टमध्ये तिने थेट गरोदरपणाचा उल्लेख केला नाही, तरीही फोटोतून तिची आनंदाची बातमी चाहत्यांपर्यंत पोहोचली आहे.
परिणीतीनं तिच्या पोस्टसोबत एक व्हिडिओही शेअर केला आहे, ज्यात ती आणि राघव चड्ढा परदेशात फिरताना दिसत आहेत. दोघेही एकमेकांच्या हातात हात घालून चालताना दिसत आहेत. या व्हिडिओसोबत तिने कॅप्शन दिलं आहे: "आमचे छोटेसे विश्व..."
परिणीती आणि राघव यांनी त्यांच्या गरोदरपणाची घोषणा करताच, चाहत्यांनी आणि अनेक सेलिब्रिटींनी कमेंट्समध्ये अक्षरशः त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहे.