मनोरंजन

चित्रपटातील पिता–कन्या नाते सत्यात; प्राजक्ता गायकवाडचे कन्यादान वास्तुतज्ञ आनंद पिंपळकर यांच्या हस्ते

प्राजक्ताचा विवाह हडपसर येथील सुप्रसिद्ध उद्योजक शंभूराजे खुटवड यांच्याशी वैदिक पद्धतीने झाला. भारतातील सुप्रसिद्ध वास्तुतज्ञ व ज्योतिषी तसेच निर्माते व कलाकार पिंपळकर यांच्या हस्ते भावपूर्ण कन्यादान विधी पार पडला.

Krantee V. Kale

‘येसूबाई साहेब’ या भूमिकेमुळे घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांचा विवाहसोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. कला, सामाजिक, राजकीय आणि व्यावसायिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीने सोहळ्याची शोभा अधिक वाढली.

प्राजक्ताचा विवाह हडपसर येथील सुप्रसिद्ध उद्योजक शंभूराजे खुटवड यांच्याशी वैदिक पद्धतीने झाला. भारतातील सुप्रसिद्ध वास्तुतज्ञ व ज्योतिषी तसेच निर्माते व कलाकार पिंपळकर यांच्या हस्ते भावपूर्ण कन्यादान विधी पार पडला. यापूर्वी त्यांनी प्राजक्ताच्या वडिलांची भूमिका काही चित्रपटांमध्ये साकारल्याने “चित्रपटातील नाते वास्तवात उतरण्याचा आनंद अवर्णनीय आहे” असे ते भावूक स्वरात म्हणाले.

विधी दरम्यान पिंपळकर दांपत्याचे डोळे पाणावले. “काही नाती रक्ताच्या पलीकडे जाऊन ईश्वराच्या अधिष्ठानाने जुळतात” असे मनोगत त्यांनी व्यक्त केले. प्राजक्ताचे आई-वडील तसेच मामा-मामी यांनीही कन्यादान विधीत सहभाग घेतला. “प्राजक्ताच्या रूपात आम्हाला लेकरू लाभले,” असे अश्विनी पिंपळकर यांनी सांगितले. पारंपरिक वैदिक वातावरणात दिमाखदाररीत्या पार पडलेल्या या विवाहसोहळ्यासाठी नवदांपत्यावर सर्वत्र शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Putin India Visit : पुतिन मॉस्कोहून रवाना; संध्याकाळी ६.३५ ला पोहोचणार दिल्लीत, मोदींसोबत खास डिनर; बघा संपूर्ण वेळापत्रक

भारत-रशिया करार : रशियन लष्करी तळ भारताला वापरता येणार

मुंबईकरांनो सावधान! अरबी समुद्र खवळणार, उंच लाटा उसळणार; आजपासून ३ दिवस मोठी भरती; किनारी जाणे टाळा - BMC चे आवाहन

'बोलो जुबां केसरी'...नववधूची स्टेजवरून शाहरूख खानकडे अनोखी डिमांड; नेटकरी घेतायेत मजा - बघा Video

मरीन ड्राइव्ह ते ऑरेंज गेट भुयारी मार्ग: प्रकल्पाचा शानदार शुभारंभ; मेट्रो-३ मार्ग, पश्चिम-मध्य रेल्वे आणि ७०० हेरिटेज इमारतींखालून जाणार रस्ता