मनोरंजन

प्राजक्ताची राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट

हजारोंच्या संख्येने आज कार्यकर्ते राज यांच्या निवासस्थानी म्हणजेच शिवतीर्थावर जमा

नवशक्ती Web Desk

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आणि लाखो तरुणांच्या गळ्यातले ताईत असणारे राज ठाकरे यांचा आज (१४ जून) ला वाढदिवस. मनसेच्या सर्वच कार्यकर्त्यांसाठी आजचा दिवस राज ठाकरेंना भेटण्यासाठी एक  असते. हजारोंच्या संख्येने आज कार्यकर्ते राज यांच्या निवासस्थानी म्हणजेच शिवतीर्थावर जमा झाले आहेत. एवढेच नाही तर काही मराठी कलाकारांनी राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्टही शेअर केली आहे. अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने देखील राज ठाकरेंना वाढदिवसाच्या अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या.

प्राजक्ताने राज ठाकरेंसोबतचे काही फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती राज ठाकरेंना पुष्पगुच्छ देताना दिसत आहे. राज ठाकरेही हसतमुखाने हा पुष्पगुच्छ स्वीकारताना दिसत आहेत. प्राजक्ताने या फोटोंसोबत एक छान कॅप्शनही लिहिले आहे.

काय आहे कॅप्शन ?

तिने या पोस्ट मध्ये म्हटले आहे की, साहेबांना आभाळभर शुभेच्छा... येणारी सर्वच वर्ष सर्वोत्कृष्ट ठरो असे तिने सांगत एक छान फोटो पोस्ट केला आहे. 

तीन रखडलेले पूल ऑक्टोबर महिन्यात सेवेत; सायन पुलाची डेडलाइन पुन्हा हुकली, विद्याविहार गोरेगाव-चित्रनगरी उड्डाणपूल अंतिम टप्यात

Thane : एसटीचे 'आवडेल तेथे कोठेही प्रवास पास' आता ऑनलाइन; चार आणि सात दिवसांचे पास घरबसल्या काढता येणार

Thane : पूर्णेकर हत्या प्रकरणी सत्ताधारी -विरोधक आमने-सामने; निष्पक्ष तपासाची आरोप-प्रत्यारोपांना धार

Mumbai : ठाकरे बंधूंचा आज गर्जना मोर्चा

Mumbai : वांद्रे-सी लिंक ते गोरेगाव आता सुसाट; ५० मिनिटांचा प्रवास १५ मिनिटांत, उन्नत मार्ग दीड वर्षांत पूर्ण होणार