प्रियंका चोप्रा मुंबईच्या 'या' स्ट्रीट फूडवर फिदा; खास वर्णन करत केलं कौतुक 
मनोरंजन

प्रियंका चोप्रा मुंबईच्या 'या' स्ट्रीट फूडवर फिदा; वर्णन करत केलं कौतुक

अभिनेत्री प्रियंका चोप्राने भारतातील स्ट्रीट फूडबाबत आपली खास पसंती व्यक्त केली आहे. तिच्या या निवडीमुळे मुंबईच्या खाद्यसंस्कृतीची पुन्हा एकदा जागतिक पातळीवर चर्चा सुरू झाली आहे.

किशोरी घायवट-उबाळे

जगभर फिरलेली आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख असलेली अभिनेत्री प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) भारतीय खाद्यसंस्कृतीबद्दल बोलताना मात्र मुंबईच्या स्ट्रीट फूडवरच फिदा झाल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे, वडापावऐवजी तिने भेळपुरीला पसंती देत या साध्या पण चविष्ट पदार्थाचं खास कौतुक केलं.

‘भेळपुरी'ला खास पसंती

अलीकडेच कॉन्डे नास्ट ट्रॅव्हलर (Condé Nast Traveller) ला दिलेल्या मुलाखतीत भारतात पहिल्यांदा येणाऱ्या पर्यटकांनी कोणता पदार्थ खावा, असा प्रश्न तिला विचारण्यात आला. यावर प्रियंकाने भारतातील विविध खाद्यपदार्थांचा उल्लेख करत मुंबईसाठी भेळपुरीला पसंती दिली.

भेळपुरीबद्दल सांगताना तिने वर्णन करत कुरमुरे, चटण्या, भाज्या आणि मसाले यांचं मिश्रण असलेल्या या पदार्थाची चव आणि स्ट्रीट स्टाइल खास असल्याचं सांगितलं. कागदाचा कोन बनवून त्यात दिली जाणारी ही भेळपुरी हीच खरी मजा असल्याचंही ती म्हणाली.

भेळपुरीच्या वेगवेगळ्या प्रकारांची लोकप्रियता

भेळपुरीचा उगम मुंबईत झाला असं मानलं जातं. जुहू बीच आणि गिरगाव चौपाटी यांसारख्या ठिकाणी हा पदार्थ मोठ्या प्रमाणात खाल्ला जातो.

कालांतराने देशभरात भेळपुरीच्या वेगवेगळ्या प्रकारांनी लोकप्रियता मिळवली आहे. पश्चिम बंगालमध्ये तर यालाच 'झालमुरी' म्हणून ओळखलं जातं.

डाएटमध्ये भेळपुरी चालते का?

आरोग्याची काळजी घेणाऱ्यांसाठी घरच्या घरी बनवलेली भेळपुरी चांगला पर्याय ठरू शकते. कमी तेल, कमी गोड चटण्या आणि जास्त भाज्यांसह बनवलेली भेळपुरी कमी कॅलरीची असते.

मात्र, बाहेर मिळणाऱ्या भेळपुरीमध्ये शेव आणि गोड चटण्या यांचं प्रमाण जास्त असू शकतं. त्यामुळे ती मर्यादित प्रमाणात खाणं योग्य ठरतं.

प्रियंका चोप्राच्या या पसंतीमुळे मुंबईच्या स्ट्रीट फूडची पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. साधी पण चवदार भेळपुरी आजही मुंबईची खास ओळख टिकवून ठेवत आहे.

"पहिली अन् शेवटची चूक"; पंतप्रधान मोदींना शिवीगाळ करणाऱ्या मुलीने मागितली माफी, म्हणाली - "मी फक्त १५...

"फक्त रीलमध्ये माफ करणार की गुन्हेही मागे घेणार?"; पंतप्रधान मोदींच्या व्हिडिओवर अभिजीत दिपकेंचा सवाल

मुंबई-सावंतवाडी प्रवाशांना दिलासा! नव्या दैनंदिन एक्सप्रेसला मंजुरी; 'या' स्थानकांवर थांबणार

आजपासून बदलले अनेक महत्त्वाचे नियम! LPG सिलिंडरपासून रेल्वे तिकीट, बँकिंगपर्यंत जाणून घ्या नवे अपडेट्स

Mumbai : स्टेशन मास्तरांवर आणखी एक जबाबदारी! आता भटक्या कुत्र्यांवरही ठेवावी लागणार नजर