मनोरंजन

'ताजा खबर'च्या यशानंतर भुवन बाम दिसणार नव्या वेब सिरीजमध्ये

'धिंडोरा', या वर्षी आलेल्या 'ताजा खबर'नंतर अभिनेता भुवन बाम आता आणखी एका वेगळ्या भूमिकेत दिसणार

प्रतिनिधी

अ‍ॅमेझॉन मिनी टीव्ही (Amazon MiniTV), अ‍ॅमेझॉनच्या मोफत व्हिडिओ स्ट्रीमिंग सेवेने आपला आगामी शो 'रफ्ता रफ्ता'चा मजेदार टीझर प्रदर्शित केला. तसेच, या वेब सिरीजमध्ये अभिनेता भुवन बामसोबत अभिनेत्री सृष्टी गांगुली रिंदानी ही जोडी दिसणार आहे. 'रफ्ता रफ्ता'ही एक ट्विस्ट असलेली रोमँटिक-कॉमेडी असून, भुवन बामला आपल्या उत्कृष्ट कंटेंटसह पाहण्यासाठी दर्शकांमध्ये उत्कंठा वाढत आहे. अशातच, 'रफ्ता रफ्ता'ही सिरीज २५ जानेवारी रोजी अ‍ॅमेझॉन मिनी टीव्हीवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे.

यासंदर्भात बोलताना अभिनेता भुवन बाम म्हणाला की, "मी मध्यमवर्गीय कुटुंबात लहानाचा मोठा झालो आहे. लग्नाकडे बघण्याचा दृष्टिकोन गेल्या काही वर्षांत ज्ञात आणि अज्ञात कारणांमुळे खूप बदलला आहे. रोमँटिक ड्रामा उलगडणारा सर्व कंटेंट यामध्ये असून, 'रफ्ता रफ्ता'मध्ये अनपेक्षित वळण घेऊन आधुनिक विवाहाच्या बारीक गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केला आहे. अ‍ॅमेझॉन मिनी टीव्ही आमचा स्ट्रीमिंग पार्टनर असल्याने आम्हाला आनंद होत आहे, कारण आमचा कंटेंट संपूर्ण भारतातील दर्शकांसाठी विनामूल्य उपलब्ध असेल."

अभिनेत्री सृष्टी गांगुली रिंदानी यावेळी म्हणाली की, "जेव्हा मला समजले की मी भुवनसोबत शोमध्ये काम करणार आहे, तेव्हा मी लगेच होकार दिला. कंटेंट क्रिएटर म्हणून आणि आता अभिनेता म्हणून मी त्याचे नेहमीच समर्थन केले आहे. आणखी एक घटक ज्याने मला लगेच कंविन्स केले ते म्हणजे याची अनोखी कथा जी पडद्यावर विवाहित जोडप्याचा नवीन दृष्टीकोन उलगडते. 'रफ्ता रफ्ता' प्रेक्षकांना आवडेल याची मला खात्री आहे. अभी तो बस टीज़र आउट हुआ है, सीरीज़ अभी बाकी है मेरे दोस्तों!"

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत