मनोरंजन

Ram Setu : अक्षय कुमारच्या बहुचर्चित 'रामसेतू' चा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला

अक्षय कुमारचा रिलीज झालेला रक्षाबंधन हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नाही.

वृत्तसंस्था

अक्षय कुमार गेल्या काही दिवसांपासून त्याच्या ‘राम सेतू’ या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. या चित्रपटात अक्षय कुमारसोबत जॅकलीन फर्नांडिसही मुख्य भूमिकेत आहे. अक्षयचे चाहते अनेक दिवसांपासून राम सेतू चित्रपटाची वाट पाहत आहेत. अक्षय कुमारचा रिलीज झालेला रक्षाबंधन हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नाही. आता राम सेतू बॉक्स ऑफिसवर काय कमाल करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. हा चित्रपट 25 ऑक्टोबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

या ट्रेलरमध्ये अक्षय कुमारचा एक वेगळा अंदाज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ट्रेलर रिलीज झाल्यापासूनच चाहत्यांमध्ये या चित्रपटाबद्दल उत्सुकता आहे. या चित्रपटाचा ट्रेलर चाहत्यांना खूप आवडला आहे. या चित्रपटात नुसरत भरूचा देखील मुख्य भूमिकेत आहे. अक्षय, जॅकलीन आणि नुसरत जोडी पाहण्यासाठी धमाका आहे. 

मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरण : गँगस्टर अबू सालेमच्या मुदतपूर्व सुटकेची याचिका फेटाळली; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Mumbai : राडारोडा वाहतूक करणाऱ्या वाहनांना नोंदणी अनिवार्य; २३ सप्टेंबरपर्यंत नोंदणीची मुदत

Thane : लोकलमधून महिला प्रवासी खाली पडली; दिवा-मुंब्रा वळणावरील Video व्हायरल

AI 80s Photo Trend : राजकीय नेत्यांनाही एआय ट्रेंडची भुरळ; १९८० च्या दशकातील रेट्रो लूक सोशल मीडियावर व्हायरल

ठाणे कोस्टल रोड-१च्या कामाला वेग; १४ महिन्यांत ४० टक्के काम पूर्ण