मनोरंजन

Junior Mehmood Passes Away: अभिनेते ज्युनियर मेहमूद यांचं दुख:द निधन; वयाच्या 67 व्यावर्षी घेतला अखेरचा श्वास

ज्युनियर मेहमूद यांच्या निधनाने संपूर्ण मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

नवशक्ती Web Desk

बॉलीवूडचे अभिनेता नईम सय्यद ऊर्फ ज्युनियर मेहमूद यांचे निधन झालं आहे. ज्युनियर महमूद यांनी मुंबईतील खार येथील त्याच्या घरात अखेरचा श्वास घेतला आहे. 67 वर्षीय ज्युनियर मेहमूद हे मागील काही वर्षांपासून पोटाच्या कर्करोगाने त्रस्त झाले होते, काही दिवसांपूर्वीच त्यांना या आजाराचे निदान झाले होते. ज्युनियर मेहमूद यांच्या निधनाने संपूर्ण मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

ज्युनियर मेहमूद यांचा मुलगा हसनैन यांनी 'एबीपी' न्यूज या वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले, "18 दिवसांपूर्वीच वडिलांना पोटाच्या कर्करोगाची माहिती मिळाली होती. मुंबईतील टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे डीन देखील म्हणाले होते की, आता त्यांच्या आयुष्यातील फक्त दोन महिने शिल्लक राहिले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना रुग्णालयात ठेवणे योग्य नाही. आज दुपारी शुक्रवारच्या प्रार्थनेनंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे."

ज्युनियर मेहमूद हे आजारी होते तेव्हा जवळपास 700 लोक त्यांना भेटायला आले होते, त्यामध्ये जॉनी लीव्हर आणि जितेंद्र यांसारख्या सेलिब्रिटींचा देखील समावेश होता. ज्युनियर मेहमूद यांच्या तब्येतीची विचारपूस करताना अभिनेते जितेंद्र हे खूप भावूक झाले होते. मेहमूद यांनी कारवा या चित्रपटामध्ये जितेंद्र यांच्या लहान भावाची भूमिका साकारली होती. एवढेच नव्हे तर ज्युनियर मेहमूद यांना भेटण्यासाठी सचिन पिळगावकरही गेले होते. ज्युनियर मेहमूद यांना भेटल्यानंतर त्यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करुन नेटकऱ्यांना त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करण्याची विनंती केली होती.

ज्युनियर मेहमूद यांनी 60 आणि 70 च्या दशकामध्ये खूप मोठ्या कलाकारांसोबत काम केल आहे. तसेच अनेक चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणून काम करून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांनी हिंदी तसेच मराठी चित्रपटांमध्येही काम केले होते. नौनिहाल, मोहब्बत जिंदगी है, संघर्ष, ब्रह्मचारी, फरिश्ता, हाथी पतंग, अंजाना, दो रास्ते, यादगार, आन मिलो सजना, जोहर मेहमूद ने हाँगकाँग, कारवां, हाथी मेरे साथी, छोटी बहू, चिंगारी, हरे राम गाता हरे, हरे राम गाता, चलने अशा अनेक चित्रपट आणि काही मालिकांमध्ये त्यांनी काम केले आहे.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी