टिश्यू सिल्क साडीत साई पल्लवीचा मोहक अंदाज; 'रामायण'च्या प्रमोशनमध्ये पारंपरिक लूकची झलक (Photo - Instagram)
मनोरंजन

टिश्यू सिल्क साडीत साई पल्लवीचा मोहक अंदाज; 'रामायण'च्या प्रमोशनमध्ये पारंपरिक लूकची झलक

Sai Pallavi : मेटॅलिक गोल्डन-कॉपर रंगाच्या टिश्यू सिल्क साडीत आलेल्या साई पल्लवीने आपल्या साध्या आणि मोहक अंदाजाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

किशोरी घायवट-उबाळे

आगामी 'रामायण : पार्ट १'च्या प्रमोशनल कार्यक्रमात शनिवारी (दि. २६) पारंपरिक फॅशनचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळाला. रणबीर कपूर, साई पल्लवी आणि रवी दुबे यांनी एथनिक लूकमध्ये उपस्थिती लावली. मात्र, मेटॅलिक गोल्डन-कॉपर रंगाच्या टिश्यू सिल्क साडीत आलेल्या साई पल्लवीने आपल्या साध्या आणि मोहक अंदाजाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या कार्यक्रमात यूट्यूब स्टार मिस्टरबीस्टही 'रामायण'च्या प्रमोशनशी संबंधित चर्चेत सहभागी झाला होता.

टिश्यू साडीत साई पल्लवीचा मोहक लूक

चित्रपटात सीतेची भूमिका साकारणाऱ्या साई पल्लवीने मेटॅलिक गोल्डन-कॉपर रंगाची टिश्यू सिल्क साडी नेसली होती. प्रकाश पडताच या साडीला आकर्षक चमक येत होती. मात्र, साडीचा लूक अतिशय भडक न वाटता तिच्या मऊ आणि प्रवाही पोतामुळे अधिक देखणा दिसत होता. किंचित चुरगळलेल्या द्रवरूप धातूसारख्या पोतामुळे साडीच्या ड्रेपला वेगळाच उठाव मिळाला होता.

साडीच्या काठावर पारंपरिक गोटा पट्टी आणि जरदोजी कामाची नक्षीदार बॉर्डर होती. फुलांच्या तसेच भूमितीय नक्षीमुळे साडीला पारंपरिक कारागिरीचा टच मिळाला होता. पदरावरील छोट्या लटकनमुळे लूकमध्ये आणखी आकर्षकता आली होती.

साईने साडीसोबत त्याच रंगसंगतीतील लहान बाह्यांचा ब्लाऊज परिधान केला होता. गळ्याभोवती, बाह्यांवर आणि ब्लाऊजच्या पुढील भागावर सोन्याचे भरजरी हातकाम आणि जरदोजीचे नक्षीकाम करण्यात आले होते. त्यामुळे तिचा संपूर्ण लूक एकसंध आणि उठावदार दिसत होता.

दागिन्यांपासून मेकअपपर्यंत साधेपणा

साईने नेहमीप्रमाणे दागिने आणि मेकअपमध्ये साधेपणाला प्राधान्य दिले. तिने पारंपरिक सोनेरी आणि मोत्यांचे लटकते कानातले तसेच नक्षीदार बांगड्या परिधान केल्या होत्या. भरजरी साडीची शोभा कायम ठेवत या दागिन्यांनी तिच्या लूकला आवश्यक तेवढीच चमक दिली.

केसांचा नीटनेटका वेणीदार अंबाडा करत तिने चेहऱ्याभोवती काही बटा मोकळ्या सोडल्या होत्या. कपाळावर छोटी टिकली, कमीत कमी मेकअप आणि चेहऱ्यावरचे नैसर्गिक हास्य यामुळे तिचा लूक अधिकच खुलून दिसत होता.

रणबीर, रवी दुबेचा एथनिक लूक

रणबीर कपूरनेही कार्यक्रमाच्या पारंपरिक वातावरणाला साजेसा कुर्ता आणि नेहरू जॅकेटचा लूक केला होता. मात्र, त्याने या पारंपरिक पोशाखासोबत डेनिम परिधान करून लूकला मॉडर्न टच दिला. सनग्लासेस आणि पॉलिश केलेल्या शूजमुळे त्याचा लूक स्मार्ट आणि कॅज्युअल दिसत होता.

रवी दुबेनेही कुर्ता आणि नेहरू जॅकेटचा पर्याय निवडला. त्यानेही डेनिमसोबत हा एथनिक लूक कॅरी करत पारंपरिक आणि आधुनिक शैलीचा मेळ साधला.

मिस्टरबीस्टचा कॅज्युअल अंदाज

यूट्यूब स्टार मिस्टरबीस्टने मात्र पारंपरिक पोशाखाऐवजी कॅज्युअल लूक निवडला. त्याने गडद रंगाचे जॅकेट, साधा टी-शर्ट आणि जीन्स परिधान केली होती. 'रामायण' च्या प्रमोशनशी संबंधित चर्चेत त्याचीही उपस्थिती लक्षवेधी ठरली.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

राज्यातील २६५ तालुक्यांत कोरडा दुष्काळ जाहीर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

'लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी एकत्र या'; SIR विरोधात ४ ऑक्टोबरला मुंबईत जनमोर्चा, राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत

सोनं-दागिने दाखवत बनवायची Reel; चोरट्यांनी VIDEO पाहून साधली संधी, घरातून १ कोटींचा ऐवज लंपास

यवतमाळमध्ये वेल्डिंग करताना भीषण स्फोट; दोघांचा जागीच मृत्यू, ५ जण गंभीर जखमी, Video

नागपूर-मुंबई दुरंतो एक्स्प्रेसवर दगडफेक; खिडक्यांच्या काचा फुटल्या, Video व्हायरल