माझी प्रकृती उत्तम- सलमान खानचा खुलासा (Photo-X)
मनोरंजन

माझी प्रकृती उत्तम - सलमान खानचा खुलासा

बॉलिवूड अभिनेता सलमान खानने सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या प्रकृतीबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेता सलमान खानने सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या प्रकृतीबाबत स्पष्टीकरण दिले आहे. ‘बिग बॉस २०’च्या दिशाभूल करणाऱ्या प्रोमोमुळे चाहत्यांमध्ये त्याच्या प्रकृतीविषयी चिंता निर्माण झाली होती. मात्र, आपल्या प्रकृतीला काहीही झालेले नाही, असे सलमानने स्पष्ट केले.

‘बिग बॉस २०’च्या प्रोमोमध्ये सलमान खानला मंचावर अचानक प्रकृती बिघडल्यासारखे दाखवण्यात आले होते. त्यामुळे त्याच्या चाहत्यांनी चिंता व्यक्त केली होती. सलमानने या कार्यक्रमाच्या १७ पर्वांचे सूत्रसंचालन केले आहे.

शनिवारी त्याने इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट शेअर करत कार्यक्रमाच्या निर्मात्यांच्या वतीने माफी मागितली. ‘माझ्या प्रकृतीला काहीही झालेले नाही. ‘बिग बॉस’चा प्रोमो ज्या पद्धतीने कापण्यात आला, तसा तो करायला नको होता,’ असे त्याने म्हटले.

‘प्रोमो ज्या पद्धतीने तयार करण्यात आला त्याबद्दल मी माफी मागतो. कदाचित कार्यक्रमाच्या प्रमोशनसाठी वापरली जाणारी ही पद्धत असावी. निर्मात्यांच्या वतीने मी माफी मागतो,’ असेही सलमानने नमूद केले.

प्रोमोमध्ये करण्यात आलेल्या बदलांबद्दल त्याने ‘बिग बॉस’च्या निर्मात्यांचे आभार मानले. ‘बिग बॉस’ने त्यात बदल केले आहेत.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

आजारपणात केलेल्या मृत्यूपत्राला मान्यता; मुंबई उच्च न्यायालयाने पत्नी, मुलांचा दावा फेटाळला

चंद्रा विरुद्ध टाटा! चंद्रशेखरन यांच्या फेरनियुक्तीला टाटा ट्रस्टचे कायदेशीर आव्हान

अडवाणी, सिसोदियांना नोटीस; मतदारयादी तपासणीमध्ये पूर्वीच्या यादीशी मेळ न जुळल्याने कारवाई

Maharashtra TET Paper Leak : दोन फरार आरोपींना अटक

Mumbai : आयआयटी प्राध्यापक मंचाचा दुल्ला यांना पाठिंबा