मनोरंजन

Salman Khan : सलमानचा नवा वाद समोर, माजी क्रिकेटपटूने घेतला आक्षेप

नवशक्ती Web Desk

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा (Salman Khan) 'किसी का भाई किसी की जान' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातील 'येंटम्मा' हे गाणे रिलीज झाले आहे. हे गाणे अभिनेता सलमान खान, व्यंकटेश दग्गुबती, राम चरण आणि पूजा हेगडे यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे. या गाण्यात सलमान खान, राम चरण आणि व्यंकटेश पिवळ्या शर्ट आणि पांढर्‍या धोतीमध्ये नाचताना दिसत आहेत. मात्र, माजी क्रिकेटपटू लक्ष्मण शिवरामकृष्णन यांनी या गाण्यावर आक्षेप घेतला आहे. एवढेच नाही तर हे गाणे आपल्या संस्कृतीला बदनाम करत असल्याने त्यावर बंदी घालावी, अशी मागणी शिवरामकृष्णन यांनी केली आहे.

आजकाल लोक पैशासाठी काहीही करतात. या लोकांना लुंगी आणि धोतर मधला फरक कळत नाही का? हा चित्रपटाचा सेट असला तरी तो मंदिर म्हणून दाखवला जात आहे. चित्रपटसृष्टीशी निगडित लोकांनी हे समजून घेतले पाहिजे की ते मंदिराच्या आवारात दागिने घालत नाहीत. असेही त्यांनी म्हटले. हे गाणे विशाल ददलानी आणि पायल देव यांनी गायले आहे. शब्बीर अहमद यांनी हे गाणे लिहिले आहे.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस