(Photo - Insta/sarangsathaye) 
मनोरंजन

"हो, आम्ही लग्न केले!" अखेर १२ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर अभिनेता सारंग आणि पॉला अडकले लग्नबंधनात

मराठी डिजिटल जगतातील लोकप्रिय जोडपं म्हणून ओळखले जाणारे अभिनेता सारंग साठ्ये आणि त्याची दीर्घकाळापासूनची पार्टनर पॉला मॅकग्लिन यांनी अखेर लग्नगाठ बांधली आहे. तब्बल १२ वर्ष एकत्र प्रेमप्रवास अनुभवल्यानंतर या दोघांनी २८ सप्टेंबर रोजी परदेशात अत्यंत खासगी समारंभात विवाह केला.

नेहा जाधव - तांबे

मराठी डिजिटल जगतातील लोकप्रिय जोडपं म्हणून ओळखले जाणारे अभिनेता सारंग साठ्ये आणि त्याची दीर्घकाळापासूनची पार्टनर पॉला मॅकग्लिन यांनी अखेर लग्नगाठ बांधली आहे. तब्बल १२ वर्ष एकत्र प्रेमप्रवास अनुभवल्यानंतर या दोघांनी २८ सप्टेंबर रोजी परदेशात अत्यंत खासगी समारंभात विवाह केला.

साधा, पण हृदयस्पर्शी सोहळा

‘भाडीपा’ या लोकप्रिय डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे घराघरात पोहोचलेलं हे कपल लग्नासाठी कुठलाही दिमाखदार सोहळा न करता त्यांनी अत्यंत साधेपणाचा मार्ग निवडला. परदेशातील ‘डीप कोव्ह’ (Deep Cove) या निसर्गरम्य ठिकाणी त्यांच्या आवडत्या झाडाजवळ कुटुंबीय आणि निवडक मित्र-मैत्रिणींसमोर हा सोहळा पार पडला. गाणी, गप्पा आणि हसतमुख वातावरणात दोघांनी एकमेकांना आयुष्यभराची साथ देण्याची शपथ घेतली.

सोशल मीडियावर भावूक पोस्ट

सारंगनं आपल्या सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर करत लिहिलं, “होय, आम्ही लग्न केलं! लग्न कधीच प्राधान्य नव्हतं, पण मागच्या वर्षी पहिल्यांदाच विभक्त होण्याची भीती वाटली. तेव्हा जाणवलं की प्रेम आणि मैत्री टिकवण्यासाठी हा टप्पा महत्त्वाचा आहे. म्हणून आम्हाला काल, २८/०९/२०२५ रोजी तो कागद मिळाला. त्याने पोस्टमध्ये लिहिलं, की ''आमची छोटीशी कहाणी - प्रेम नेहमीच जिंकेल!” या पोस्टनंतर चाहत्यांकडून सारंग आणि पॉला यांच्यावर शुभेच्छांचा अक्षरशः वर्षाव सुरू आहे.

ओला दुष्काळ जाहीर करण्यास मुख्यमंत्री फडणवीसांचा नकार; पण सर्व सवलती लागू, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन

"२६/११ नंतर पाकिस्तानला प्रत्युत्तर देणार होतो, पण...; पी. चिदंबरम यांचा गौप्यस्फोट

Pakistan Blast : पाकिस्तान हादरले! क्वेट्टामध्ये आत्मघाती बॉम्बस्फोट, १० ठार, भयानक व्हिडिओ समोर

Dombivali : झोपेतच सर्पदंश! ३ वर्षांच्या चिमुकलीसह मावशीचा मृत्यू; KDMC रुग्णालयावर निष्काळजीपणाचा आरोप

पावसाची विश्रांती; पूरस्थिती कायम! पूरग्रस्त शेतकऱ्यांना हवा मदतीचा आधार; अतिवृष्टी, गारपीट, टंचाईग्रस्तांना जिल्हा वार्षिक निधीतून मदत