मनोरंजन

'बोलो जुबां केसरी'...नववधूची स्टेजवरून शाहरूख खानकडे अनोखी डिमांड; नेटकरी घेतायेत मजा - बघा Video

गुटखा-पान मसाल्याच्या जाहिरातींवरून कलाकारांना अनेकदा सोशल मीडियावर प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता शाहरूख खान अलीकडेच दिल्लीमध्ये एका लग्नात परफॉर्मन्ससाठी पोहोचला होता. यावेळी त्याने नृत्य सादरीकरणही केले. पण, या सर्वात नववधूने शाहरूखकडे केलेल्या अनोख्या विनंतीचा क्षण लक्षवेधी ठरला.

Krantee V. Kale

गुटखा-पान मसाल्याच्या जाहिरातींवरून कलाकारांना अनेकदा सोशल मीडियावर प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता शाहरूख खान अलीकडेच दिल्लीमध्ये एका लग्नात परफॉर्मन्ससाठी पोहोचला होता. यावेळी त्याने नृत्य सादरीकरणही केले. पण, या सर्वात नववधूने शाहरूखकडे केलेल्या अनोख्या विनंतीचा क्षण लक्षवेधी ठरला. हा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर चांगलाच व्हायरल झाला असून नेटकरी आपआपली मते मांडत आहेत. काहीजण शाहरुखला ट्रोल करतायेत, तर काहीजण मजा घेताना दिसत आहेत.

व्हायरल व्हिडिओमध्ये दिसतंय की, नववधू स्टेजवरच शाहरूखला 'बोलो जुबां केसरी'वाला डायलॉग बोलायची विनंती करते. पण, शाहरूख आपल्या विनोदबुद्धीने विनंती टाळतो आणि हसत हसत हिंदीत म्हणतो, "‘एक बार बिजनेस वालों के साथ बिजनेस कर लो, जान नहीं छोड़ते. गुटखा वाले भी न यार. हर बार जब करता हूं, तो पैसे लेता हूं डार्लिंग. अपने पापा को कह देना तुम. अच्छी बातें करवा लो न यार. यहां (शादी में) पर थोड़े ही न जुबां केसरी-जुबां केसरी करेंगे..." त्यानंतरही वधू शाहरूखकडे पुन्हा विनंती करते. त्यावर, अरे नहीं...बैन हो चुकी हैं चीजें. बिल्कुल भी गलत बातें मत करो. मुझे भी बैन करवा दोगी." इतके बोलल्यावरही जेव्हा वधू पुन्हा विनंती करते तेव्हा, "मेरी फैन हो या विमल की फैन हो तुम?", असे शाहरूख म्हणतो.

शाहरूख खानचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून नेटकरी कमेंट्समध्ये व्यक्त होत आहेत. कोणी शाहरूखला ट्रोल करतंय तर कोणी त्याची खिल्ली उडवताना दिसतंय.

‘रेरा'चे अधिकारी, न्यायाधिकरण फ्लॅट वादाचा फैसला करु शकत नाहीत; उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्वाळा

राज्यभरात दीड कोटींची रोकड जप्त; १५ जणांवर गुन्हा दाखल; निवडणुकीत आचार संहितेचे उल्लंघन भोवणार

मुंबईकरांनो सावधान! अरबी समुद्र खवळणार, उंच लाटा उसळणार; आजपासून ३ दिवस मोठी भरती; किनारी जाणे टाळा - BMC चे आवाहन

शेतकऱ्यांसाठी केंद्राची मदत लवकरच; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे स्पष्टीकरण

सर्पदंशानंतर अल्पावधीतच कळणार साप किती विषारी; राज्य सरकार खरेदी करणार 'ही' खास किट