मनोरंजन

एम्पायर मॅगझिनच्या टॉप ५० महान अभिनेत्यांमध्ये शाहरुख खानचा समावेश; यादीत एकमेव भारतीय

जगातील सर्वात अग्रगण्य मॅगझिन्सपैकी एकाने आतापर्यंतच्या ५० महान अभिनेत्यांची यादी जाहीर केली आहे

वृत्तसंस्था

बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खानचे चाहते केवळ भारतातच नव्हे तर जगभर पसरले आहे, यात शंका नाही. जगभरातील प्रेक्षकांचे या अभिनेत्यावर प्रेम असून, त्याचा सम्मान करतात. तसेच, आपल्या अभिनय कौशल्याने तसेच उत्कृष्ट स्क्रीन प्रेझेन्स आणि नम्रतेने शाहरुख खानने वेळोवेळी प्रेक्षकांचे मने जिंकली आहेत. अशातच, जगातील सर्वात अग्रगण्य मॅगझिन्सपैकी एकाने आतापर्यंतच्या ५० महान अभिनेत्यांची यादी जाहीर केली आहे आणि या यादीत स्थान मिळवणारा शाहरुख खान हा एकमेव भारतीय अभिनेता ठरला आहे.

नुकतीच ही यादी आपल्या सोशल मीडियावर शेअर करत या मॅगझीनने आतापर्यंतच्या टॉप ५० महान अभिनेत्यांची नावे जाहीर केली आहेत. या यादीमध्ये आतापर्यंतच्या ५० महान अभिनेत्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये शाहरुख खान हा एकमेव भारतीय अभिनेता आहे. याशिवाय या यादीत डेन्झेल वॉशिंग्टन, टॉम क्रूझ, फ्लॉरेन्स प्यू आणि टॉम हँक्स या अभिनेत्यांचादेखील समावेश आहे. अशातच, सध्या शाहरुख खान जानेवारीमध्ये 'पठाण' आणि त्यानंतर 'जवान' आणि 'डंकी' या चित्रपटांच्या रिलीजसाठी तयारी करत आहे.

नवीन GST सुधारणांमुळे ग्राहकांना दिलासा; आजपासून अन्न, गृहनिर्माण, इलेक्ट्रॉनिक्स, औषधे, वाहने, शेती, आरोग्यसेवा स्वस्त

आजपासून GST बचत उत्सव! पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा : स्वदेशी, स्वावलंबनावर भर; जनतेची २.५ लाख कोटींपेक्षा जास्त बचत होणार

मतदार यादी सखोल परीक्षणासाठी सज्ज व्हावे; केंद्रीय निवडणूक आयोगाचे निर्देश

राज्यात नवरात्रोत्सवाची धूम; ठाण्यात बाजारपेठांमध्ये गर्दी

भिवंडीत तीन संशयित दहशतवाद्यांना अटक; उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई