आरक्षणाच्या व्हायरल पोस्टवर शिल्पा शेट्टीचा संताप; म्हणाली - "माझ्या नावाने खोटी माहिती पसरवली... 
मनोरंजन

आरक्षणाच्या व्हायरल पोस्टवर शिल्पा शेट्टीचा संताप; म्हणाली - "माझ्या नावाने खोटी माहिती पसरवली...

व्हायरल झालेल्या स्क्रीनशॉटमध्ये शिल्पा शेट्टीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटप्रमाणेच प्रोफाइल फोटो आणि लेआउट वापरण्यात आला होता.

किशोरी घायवट-उबाळे

मुंबई : आरक्षणाबाबत सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या बनावट पोस्टवर अभिनेत्री शिल्पा शेट्टीने तीव्र संताप व्यक्त केला आहे. तिच्या नावाने व्हायरल होणारी पोस्ट दिशाभूल करणारी असल्याचे तिने मंगळवारी (दि. २८) स्पष्ट केले. "माझ्या नावाने खोटी माहिती पसरवली जात आहे," असे म्हणत अशा फेक पोस्टवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन तिने चाहत्यांना केले.

आरक्षणाबाबतच्या कथित पोस्टमुळे वाद

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका स्क्रीनशॉटमध्ये शिल्पा शेट्टीच्या नावाने आरक्षणासंदर्भातील वादग्रस्त विधान दाखवण्यात आले होते. त्या पोस्टमध्ये आरक्षण आणि जातीच्या आधारावर उपचार करण्याबाबत वक्तव्य करण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर शिल्पा शेट्टीने तातडीने भूमिका स्पष्ट केली.

'ही पोस्ट पूर्णपणे बनावट'

सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत शिल्पा शेट्टी म्हणाली, "आरक्षणाबाबतची बनावट विधाने माझ्या नावाने जोडली जात असल्याचे पाहून मला धक्का बसला आहे. हा पूर्णपणे बनावट, द्वेषपूर्ण आणि खोटा मजकूर आहे. कृपया अशा फेक न्यूजवर विश्वास ठेवू नका."

"माझ्या नावाने खोटी माहिती पसरवली...

AI च्या मदतीने तयार केल्याचा संशय

व्हायरल झालेल्या स्क्रीनशॉटमध्ये शिल्पा शेट्टीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटप्रमाणेच प्रोफाइल फोटो आणि लेआउट वापरण्यात आल्यामुळे अनेकांना तो खरा असल्याचा भास झाला. मात्र, संबंधित पोस्ट एआयच्या माध्यमातून तयार करण्यात आल्याचे स्पष्ट झाले.

विजय वर्माही ठरला होता लक्ष्य

यापूर्वी अभिनेता विजय वर्माच्या नावानेही अशाच प्रकारची बनावट पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. आरक्षण आणि विशेषाधिकारांबाबतचे कथित विधान त्याच्या नावाने प्रसारित करण्यात आले होते. यानंतर विजय वर्माने 'एक्स'वर स्पष्टीकरण देत, "मी ही पोस्ट कधीच केली नाही. हे सर्व खोटे आहे," असे स्पष्ट केले होते.

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या आझाद मैदानातील आंदोलनाला मुंबई पोलिसांचा नकार; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

Rajapur : गणपतीसाठी कोकणात निघालेल्या चाकरमान्यांच्या गाडीला भीषण अपघात; ८-१० जण गंभीर जखमी, वाहनाचा चक्काचूर

माथेरानला मिळणार पाइपलाइनद्वारे गॅस; महानगर गॅसच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी

Mumbai : नालासोपाऱ्यात ट्रॉली उलटल्याने गणेशमूर्ती कोसळली; भाविक थोडक्यात बचावले, Video

Ulhasnagar : बाप्पा येणार... पण खड्ड्यांतूनच? महापौरांचा संकल्प गेला खड्ड्यात! अजूनही विघ्न कायम; नागरिकांचा संतप्त सवाल