मनोरंजन

शिव ठाकरेला पाण्याची आधी भीती वाटत होती, पण...

बिग बॉस हिंदी नंतर या कार्यक्रमात जायचं त्याचं स्वप्न होतं. बाप्पाने माझं स्वप्नं पूर्ण केलं, असंही शिव म्हणाला

नवशक्ती Web Desk

रिऍलिटी शो मधून घराघरात पोचलेला मराठी चेहरा शिव ठाकरे लवकरच आणखी एका धमाल शोमध्ये दिसणार आहे. रोडीज, बिग बॉस मराठी, 'बिग बॉस हिंदी या शोज मधून शिव ठाकरेला भारतभरात लोकप्रियता मिळाली. आपला माणूस शिव ठाकरे असंही त्याला म्हटलं जाऊ लागलं. शिव ठाकरे आता त्याची पुढची झेप घ्यायला सज्ज झालाय.

रिऍलिटी शोमधील अतिशय आव्हानात्मक शो किंवा खतरनाक शो म्हणून ज्याकडे पाहिलं जातं तो शो म्हणजे खतरों के खिलाडी... नुकतंच शिव ठाकरेने स्वतः याची कबुली एका मुलाखतीत दिलीय, की शिव ठाकरे खतरों के खिलाडीच्या तेराव्या सीजन मध्ये जाणार आहे. बिग बॉस हिंदी नंतर या कार्यक्रमात जायचं त्याचं स्वप्न होतं. बाप्पाने माझं स्वप्नं पूर्ण केलं, असंही शिव म्हणाला.

रोहित शेट्टीच्या खतरों के खिलाडी मध्ये आगीसोबत, पाण्यासोबत अनेक स्टंट असतात. शिव ठाकरेला पाण्याची आधी भीती वाटत होती, पण खास या शो मध्ये जाण्यासाठी शिव आता स्विमिंग शिकत आहे. फिटनेस तर त्याचा आधीपासूनच चांगला आहे. बिग बॉसप्रमाणे खतरों के खिलाडी मधेही शिव ठाकरे टॉप ३ मध्ये जातो का हे पाहणे महत्वाचे ठरेल. 

Ind Vs Pak Asia Cup : भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज लढत आज; दुबईत रंगणार मैदानातील महायुद्ध

Ind Vs Pak Asia Cup : भारत-पाक सामन्यावरून राजकीय घमासान!

Ind Vs Pak Asia Cup : ''भारतासमोर खेळण्याशिवाय पर्याय नाही''; अखेर BCCI ने सांगितले कारण

भारत-पाकिस्तान सामना : शिवसेना ठाकरे गटाची महिला आघाडी रस्त्यावर; 'माझं कुंकू, माझा देश' आंदोलन, पंतप्रधान मोदींना पाठवलं 'सिंदूर'

९९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ठरले; पानिपतकार विश्वास पाटलांच्या नावावर शिक्कामोर्तब