मनोरंजन

Shiv Thakare : 'तो माझ्या आई बाबांना भेटला आणि...'; शिव ठाकरेने सांगितला सलमान खानसोबतचा किस्सा

बिग बॉस १६चा उपविजेता ठरलेल्या शिव ठाकरेने (Shiv Thakare) सांगितला अभिनेता सलमान खानसोबतच किस्सा

प्रतिनिधी

बिग बॉस १६चा विजेता म्हणून एमसी स्टॅनचे नाव घोषित करण्यात आले. यानंतर उपविजेता ठरलेल्या शिव ठाकरेचे चाहते मात्र नाराज झाले. विजेत्यापेक्षा शिव ठाकरेचीच चर्चा सध्या सोशल मीडियावर होताना दिसत आहे. दरम्यान शिव ठाकरेने बिग बॉसच्या घराबाहेर येताच सलमान खानसोबतच एक किस्सा आपल्या चाहत्यांसोबत शेअर केला. त्याने सलमान खान आणि त्याच्या आई-बाबांच्या भेटीचा किस्साही सांगितला.

तो म्हणाल की, " जेव्हा सलमान खान माझ्या आई-बाबांना भेटला, तेव्हा त्याने मराठीमध्ये त्यांच्याशी संवाद साधला. तो क्षण माझ्यासाठी अभिमानास्पद होता. ही गोष्ट माझ्यासाठी अतिशय महत्त्वाची होती. माझ्या आई-बाबांना माझ्या आत्तापर्यंतच्या प्रवासाचा अभिमान वाटतो. मी सलमानसोबत एकाच मंचावर होते, यापेक्षा कोणतीच मोठी गोष्ट असू शकत नाही." असे म्हणत त्याने आनंद व्यक्त केला. दरम्यान, शिव ठाकरे हा सलमान खानच्या आगामी चित्रपटामध्ये झळकणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे मोठ्या पडद्यावर लवकरच शिव ठाकरेला सलमानसोबत स्क्रीन शेअर करायला मिळणार असल्याने त्याचे चाहते उत्सुक आहेत.

केतनला कुणी ढकललं? सिया गोयलच्या 'लाय डिटेक्टर' चाचणीसाठी पोलिसांची न्यायालयात धाव

बंगळुरूत काळाचा घाला! दगडखाणीत ४० फुटांवरून कोसळला ग्रॅनाइटचा महाकाय खडक; ८ मजुरांचा जागीच मृत्यू, अनेक जखमी

अटल टनेलबाहेर भरधाव स्कॉर्पिओला भीषण अपघात; लोखंडी सळ्या आरपार घुसल्याचा VIDEO समोर; एकाचा मृत्यू, तिघे जखमी

Mumbai Rains : गटारात पडलेल्या व्यक्तीची दहिसर पोलिसांकडून सुखरूप सुटका; बचावकार्याचा Video व्हायरल

ठाण्याला पावसाने झोडपले; धरण क्षेत्रातही दमदार हजेरी