अरिजीत सिंगनंतर आता श्रेया घोषाल सुद्धा घेणार गायनातून ब्रेक? म्हणाली, "कधी कधी मलाही असं वाटतं…" 
मनोरंजन

अरिजीत सिंगनंतर आता श्रेया घोषाल सुद्धा घेणार गायनातून ब्रेक? म्हणाली, "कधी कधी मलाही असं वाटतं…"

अरिजीत सिंगने पार्श्वगायनातून ब्रेक घेण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर संगीतविश्वात चर्चेला उधाण आले आहे. याच पार्श्वभूमीवर गायिका श्रेया घोषाल हिनेही एका मुलाखतीत गायनाबाबत आपली भूमिका स्पष्ट करत, कधी कधी ब्रेक घ्यावासा वाटतो असे सांगितले असून लिप-सिंकबाबतही तिने ठाम मत व्यक्त केले आहे.

Mayuri Gawade

सुमधुर आवाज आणि भावपूर्ण गाण्यांमुळे संगीतप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवणारी श्रेया घोषाल ही आजच्या काळातील सर्वात लोकप्रिय पार्श्वगायिकांपैकी एक आहे. मात्र अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत तिने गायनाबाबत आपला ठाम दृष्टिकोन मांडत, भविष्यात गाणं सोडण्याची वेळ कधी येऊ शकते याबद्दल स्पष्ट संकेत दिले आहेत.

प्रसिद्ध गायक अरिजीत सिंगने नुकताच पार्श्वगायनातून ब्रेक घेण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर संगीतविश्वात चर्चा रंगल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर श्रेया घोषालनेही एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत आपलं मत मांडलं. स्टेजवर लाइव्ह गाणं गाणं हे गायकासाठी अत्यंत महत्त्वाचं असतं, असं सांगताना ती म्हणाली की, प्रेक्षकांसमोर उभं राहून प्रत्यक्ष गाणं सादर करण्याचाच खरा आनंद असतो.

"त्या दिवशी मी गाणं बंद करेन"

लिप-सिंक करून गाणं सादर करण्याबद्दल बोलताना श्रेया स्पष्ट म्हणाली, "स्टेजवर गाताना लिप-सिंक करणं मला अजिबात मान्य नाही. ज्या दिवशी मला असं करावं लागेल, त्या दिवशी मी गाणंच बंद करेन. जोपर्यंत माझा आवाज साथ देतो आणि मी नियमित रियाज करू शकते, तोपर्यंत मी रसिकांसाठी लाइव्ह गाणं गात राहीन."

लाइव्ह परफॉर्मन्सची मोठी जबाबदारी

लाइव्ह परफॉर्मन्स करताना कलाकारावर मोठी जबाबदारी असते, याकडेही तिने लक्ष वेधले. कलाकाराच्या वैयक्तिक आयुष्यात काहीही सुरू असलं, तरी त्याचा परिणाम स्टेजवर दिसू नये, असं ती म्हणाली. कारण संगीत अनेकांसाठी त्यांच्या दुःखातून बाहेर पडण्याचं माध्यम असतं, असंही तिने नमूद केलं.

अरिजीत सिंगबद्दल श्रेया काय म्हणाली?

दरम्यान, अरिजीत सिंगच्या निर्णयाबद्दल बोलताना श्रेयाने त्याच्या धाडसाचं कौतुक केलं. “असा निर्णय घेण्यासाठी खूप धैर्य लागतं. कधी कधी मलाही ब्रेक घ्यावासा वाटतो. अरिजीत संगीताकडे केवळ काम म्हणून पाहत नाही, तर त्यातून मिळणाऱ्या आनंदासाठी काम करतो. त्यामुळेच लोक त्याच्यावर इतकं प्रेम करतात,” असंही ती म्हणाली.

मराठी, हिंदीसह अनेक भारतीय भाषांमध्ये गाणी गाऊन श्रेया घोषालने स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. गायिकेबरोबरच ती विविध संगीत रिॲलिटी शोमध्ये परीक्षक म्हणूनही झळकत असते.

हिटवेव्हनंतर हवामानात बदल! मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये पावसाचा अंदाज; 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट

मीरा-भाईंदरच्या रुग्णालयात धक्कादायक प्रकार; व्हेंटिलेटरवरील वृद्ध महिलेच्या हाताला उंदराने कुरतडले, कुटुंबीयांची चौकशीची मागणी

हे काय नवीन? लिंबूपाण्यावरही 'गॅस क्रायसिस चार्जेस'; कॅफेचं बिल सोशल मीडियावर व्हायरल

FASTag Annual Pass : फास्टॅग वार्षिक पास महागला; १ एप्रिलपासून मोजावी लागणार 'इतकी' किंमत

MUMBAI :मेट्रोच्या २७ स्थानकांजवळ नो-पार्किंग; ट्रॅफिक पोलिसांचा महत्त्वाचा आदेश