मनोरंजन

सुप्रसिद्ध रॅपर बादशाहच्या अडचणी वाढणार; नागपूर न्यायालयाने दिले 'हे' आदेश

बॉलिवूडचा सुप्रसिद्ध रॅपर बादशाहवर आहे अश्लील गाणे गायल्याचा आरोप; नागपूर न्यायालयाने यासंदर्भात दिले आहेत काही महत्त्वाचे आदेश

प्रतिनिधी

बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक आणि रॅपर बादशाहसमोरच्या अडचणींमध्ये वाढ होणार आहे. त्याच्यावर अश्लील गाणे गायल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. याप्रकरणी नागपूर न्यायालयात प्रकरण चालू असून त्याने एकदाही न्यायालयात हजेरी लावलेली नाही. अशामध्ये आता ७ फेब्रुवारीला हजेरी लावण्याचे आदेश दिले आहेत. या आरोपांवर उत्तर देण्याची अंतिम संधी श्रेणी न्यायदंडाधिकारी एस. एस. जाधव यांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आनंदपाल सिंग गुरुपालसिंह जब्बाल यांनी पाचपावली पोलिस ठाण्यात तक्रार केली होती. या प्राप्त तक्रारीवरून गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी गायक हनी सिंग आणि बादशाह या दोघांच्या आवाजाचे नमुने पोलिसांना घ्यायचे आहेत. त्यानंतर हनी सिंगने याच्या आवाजाचे नमुने घेण्यात आले. मात्र, अद्याप बादशाहच्या आवाजाचे नमुने मिळालेले नाहीत. यासंदर्भात, तक्रारकर्त्यांच्या वकिलाने त्याच्या आवाजाचे नमुने घेण्यात यावे, असा अर्ज न्यायालयाकडे केला आहे.

दरम्यान, सुनावणी सुरु असताना बादशहाने आतापर्यंत अनेक वकील बदलले आहेत. यापूर्वी तक्रारीची प्रत देऊनही सुनावणीत बादशाहच्या वकिलांनी तक्रारीची प्रत मागितली होती. हा वेळकाढूपणा असल्याचा युक्तिवाद तक्रारकर्त्यांचे वकील रेणू यांनी केला. यावरून न्यायालयाने बादशहाचा अर्ज फेटाळून लावला. तसेच आवाजाच्या नमुन्याबाबत तक्रारकर्त्याने सादर केलेल्या अर्जावर उत्तर देण्याची अंतिम संधी दिली. बादशाहने ७ फेब्रुवारीला होणाऱ्या सुनावणीदरम्यान उत्तर न दिल्यास त्याच्याविरुद्धच्या अर्जावर त्याची बाजू न ऐकताच निकाल दिला जाईल, असे न्यायालयाने आदेशात स्पष्ट केले आहे.

हॉटेल उद्योगावर मंदीचे सावट; शुल्क कमी न केल्यास ‘हॉटेल बंदचा’ व्यावसायिकांचा इशारा

IND vs ENG 2025 : क्रिकेटच्या पंढरीत भारताची कसोटी! लॉर्ड्स स्टेडियमवर आजपासून तिसरा सामना, मालिकेत आघाडी घेण्याचे लक्ष्य

मुंबई-गोवा महामार्गावरील नवीन सिमेंटचे रस्तेही खचले; शिवसेना ठाकरे गटाच्या पाहणी दौऱ्यात प्रशासनाची पोलखोल

सरकारी धोरणांविरोधात आंदोलनांची लाट; ठाणे-भिवंडी-पालघरमध्ये संघटनांचा एल्गार

भारतीय वंशाचे सबिह खान Apple चे नवे COO; लवकरच घेणार जेफ विल्यम्स यांची जागा