मनोरंजन

गायिका सावनी रविंद्र घेऊन येतेय संगीतविश्वातील पहिलाच मराठी म्युझिक पोडकास्ट शो!

Savani Ravindra: आपल्या मधाळ आवाजानं रसिकांना मंत्रमुग्ध करणारी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त गायिका सावनी रविंद्र ही संगीतविश्वातील पहिलाच मराठी म्युझिक पोडकास्ट घेऊन येत आहे.

Tejashree Gaikwad

आपल्या मधाळ आवाजानं रसिकांना मंत्रमुग्ध करणारी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त गायिका सावनी रविंद्र ही नेहमीच काहीतरी नवनवीन गोष्टी तिच्या प्रेक्षकांसाठी करत असते. तिने नुकतच सावनी म्युझिक पोडकास्ट शो सुरु केला आहे. हा शो संगीतविश्वातील पहिलाच ‘मराठी म्युझिक पोडकास्ट’ आहे.

ज्यात स्वतः गायिका लोकप्रिय गायक, संगीतकार, वादक यांच्यासोबत मनसोक्त संगीतविषयक गप्पा मारणार आहे. या पोडकास्टच्या पहिल्याच भागात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त गायक राहुल देशपांडे हे उपस्थित होते. सावनी म्युझिक या पोडकास्ट वर हा पहिलाच भाग आपण पाहू शकतो. यापूर्वी सावनीने मराठी, हिंदी,  गुजराती, तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नडा, कोंकणी अशा प्रादेशिक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. तसेच गेल्यावर्षीच्या बहुचर्चित बाईपण भारी देवा या चित्रपटातील सावनीने गायलेली मंगळागौर सगळ्यांच्याच पसंतीस पडली.

सावनी तिच्या म्युझिक पोडकास्टविषयी सांगते, “मी एक संगीताची विद्यार्थी म्हणून गेली अनेक वर्ष या संगीतसृष्टीत काम करत आहे. काही चढउतार देखील मी पाहिले. तर या प्रवासात अनेक माणस प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मला भेटली. त्यांच्याकडून अनेक गोष्टी मला शिकायला मिळाल्या. म्युझिक पोडकास्टच्या निमित्ताने संगीतात नवनवीन प्रयोग करू इच्छिणाऱ्या गायकांसाठी तसेच या क्षेत्रात असणाऱ्या सर्व कलाकारांसाठी, जाणकार प्रेक्षकांसाठी मी हा पोडकास्ट सुरू केला आहे. सर्वांनी नक्कीच हा पोडकास्ट पाहा. आणि मला कमेंट्सद्वारे आपल्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत पोहोचवा.”

ओला दुष्काळ जाहीर करण्यास मुख्यमंत्री फडणवीसांचा नकार; पण सर्व सवलती लागू, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन

"२६/११ नंतर पाकिस्तानला प्रत्युत्तर देणार होतो, पण...; पी. चिदंबरम यांचा गौप्यस्फोट

Pakistan Blast : पाकिस्तान हादरले! क्वेट्टामध्ये आत्मघाती बॉम्बस्फोट, १० ठार, भयानक व्हिडिओ समोर

Dombivali : झोपेतच सर्पदंश! ३ वर्षांच्या चिमुकलीसह मावशीचा मृत्यू; KDMC रुग्णालयावर निष्काळजीपणाचा आरोप

पावसाची विश्रांती; पूरस्थिती कायम! पूरग्रस्त शेतकऱ्यांना हवा मदतीचा आधार; अतिवृष्टी, गारपीट, टंचाईग्रस्तांना जिल्हा वार्षिक निधीतून मदत