मनोरंजन

लाडक्या भावोजींचा मुलगा अडकणार लग्नबंधनात! सोहमचं 'ठरलं तर मग'; 'हि' प्रसिद्ध अभिनेत्री होणार बांदेकरांची सून

महाराष्ट्राचे लाडके भावोजी म्हणून प्रसिद्ध असलेले अभिनेते आदेश बांदेकर यांच्या घरातून लवकरच लग्नाचे मंगलध्वनी ऐकायला मिळणार असल्याच्या चर्चा रंगत आहे. आदेश बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकर लवकरच लग्नबंधनात अडकणार असून, त्याची जीवनसाथी ही लोकप्रिय मराठी अभिनेत्री आहे.

नेहा जाधव - तांबे

महाराष्ट्राचे लाडके भावोजी म्हणून प्रसिद्ध असलेले अभिनेते आदेश बांदेकर यांच्या घरातून लवकरच लग्नाचे मंगलध्वनी ऐकायला मिळणार असल्याच्या चर्चा रंगत आहे. आदेश बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकर लवकरच लग्नबंधनात अडकणार असून, त्याची जीवनसाथी ही लोकप्रिय मराठी अभिनेत्री आहे.

पूजा बिरारी हि अभिनेत्री असून सोहम लवकरच लग्नगाठ बांधणार असल्याचे वृत्त राजश्री मराठीने दिले आहे. सोहमने अभिनय आणि निर्मिती अशा दोन्ही क्षेत्रांत आपली ओळख निर्माण केली आहे. 'ललित 205' ही मालिका त्याने निर्मिती केली होती, तर, 'नवे लक्ष्य' मालिकेतून त्याने अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. सध्या स्टार प्रवाहवरील ठरलं तर मग! आणि घरोघरी मातीच्या चुली या दोन मालिकांचा निर्माता म्हणून तो काम करत आहे.

दुसरीकडे पूजा बिरारीने 'येड लागलं प्रेमाचं' या मालिकेत मंजिरीची भूमिका साकारून प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यानंतर 'साजणा' आणि 'स्वाभिमान - शोध अस्तित्वाचा' या मालिकांमधून तिने आपली स्वतंत्र छाप पाडली. इन्स्टाग्रामवर तिचा मोठा चाहतावर्ग असून, तिच्या स्टाइल आणि अभिनयामुळे ती तरुणांच्या मनावर राज्य करते.

याआधी एका चाहत्याने "लग्नासाठी तुला कशी मुलगी हवी आहे?" असा प्रश्न विचारल्यावर सोहमने हसत उत्तर दिलं होतं "कशीही चालेल, फक्त आईला आवडली पाहिजे बस!" त्याचे हे उत्तर सोशल मीडियावरही चर्चेत आले होते.

आता मात्र ही चर्चा प्रत्यक्षात उतरण्याच्या मार्गावर असल्याचे समजते. सोहम व पूजाचे लग्न लवकरच पार पडणार असून, या स्टारकपलच्या लग्नाची अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे.

मुंबईसाठी पुढचे तीन तास महत्त्वाचे; संध्याकाळी समुद्राला येणार भरती, मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा

नांदेडमध्ये पावसाने घरं उध्वस्त; आमदार पोहचले २४ तासांनी, ग्रामस्थांचा संताप

Mumbai Rain Update : ६ तासांत सांताक्रूझमध्ये विक्रमी पर्जन्यमान; १५१ मिमी पावसाची नोंद

मुसळधार पावसाने मुंबईची लाईफलाईन थांबली; मध्य आणि हार्बर सेवा पूर्णपणे ठप्प, पश्चिम रेल्वेची सेवा मात्र सुरू

मुंबईकरांनो सावधान! मिठी नदीने ओलांडली धोक्याची पातळी