@aslisona/Instagram  
मनोरंजन

Sonakshi Sinha: वडिलांप्रमाणे सोनाक्षी सिन्हा राजकारणात प्रवेश करणार? म्हणाली - "मग, तिथेही तुम्ही...

Tejashree Gaikwad

Sonakshi Sinha to Join Politics: हीरामंडी: द डायमंड बाजार ही वेब सिरीज सध्या सोशल मीडियावर सगळ्यात जास्त चर्चेत आहे. संजय लीला भन्साळी यांच्या या वेब सिरीजमध्ये अनेक अभिनेत्री आहेत. हीरामंडी: द डायमंड बाजार ही वेब सिरीज १ मे रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज झाली आहे. मनीषा कोईराला, अदिती राव हैदरी, संजीदा शेख, शर्मीन सेगल, रिचा चड्ढा आणि सोनाक्षी सिन्हा अशी भली मोठी अभिनेत्रींची स्टार कास्ट यामध्ये आहे. या वेब सिरीजमध्ये दुहेरी भूमिकेत दिसलेल्या सोनाक्षी सिन्हाच्या अभिनयाचे खूप कौतुक होत आहे. संजय लीला भन्साळींच्या या बहुप्रतिक्षित मालिकेत सोनाक्षी सिन्हाने रेहाना आणि फरीदानची भूमिका साकारली आहे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत कथा या दोन पात्रांच्या भोवती फिरत असल्याचे दिसते. याच दरम्यान सोनाक्षी वेगळ्या कारणानेही चर्चेत आहे. अभिनेत्रीने राजकारणात येण्याबाबत मौन सोडले आहे.

देशात सध्या लोकसभा निवडणुका सुरू आहेत. सोनाक्षी सिन्हाचे वडील शत्रुघ्न सिन्हा हे देखील राजकारणात आहेत. याच कारणांमुळे आता सोनाक्षीसुद्धा राजकारणी होणार का अशी चर्चा आहे. अभिनेत्री अभिनयातून राजकारणी होण्याचा कधी विचार करतेय? याबाबत तिने स्वतःच मौन सोडले आहे.

सोनाक्षी राजकारणात येणार?

सोनाक्षी सिन्हाने युटूबर राज शामानी यांच्याशी संवाद साधला. यावेळी तिने राजकारणात येणार का याबद्दल उत्तर दिले. तिने नेपोटिझम अर्थात घराणेशाहीचा मुद्दा मेन्शन करत म्हणाली की "नाही, मग तिथेही तुम्ही नेपोटिझम नेपोटिझम कराल. मला वाटत नाही की मी हे करेल, कारण मी माझ्या वडिलांना हे करताना पाहिले आहे."

राजकारणासाठी स्वतःला योग्य समजत नाही

सोनाक्षी पुढे असेही म्हणाली की ती खूप प्रायव्हेट व्यक्ती असल्याने तिला राजकारणात येऊ नये असे वाटते. "मला वाटत नाही की माझ्याकडे राजकारणासाठी योग्यता आहे. माझे वडील खूप नेहमी लोकांमध्ये राहणारे आहेत. मी खूप प्रायव्हेट व्यक्ती आहे आणि राजकारणी लोकांना नेहमी लोकांमध्ये राहावे लागते. तुम्ही त्यांच्यासाठी तिथे असले पाहिजे. मी माझ्या वडिलांना असे करताना पाहिले आहे, म्हणून माझ्याकडे मला स्वतःला बघून वाटत नाही की माझ्यात ते आहे."

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त