मनोरंजन

World Music Day 2024: संगीतकार हन्‍स झिमरचे चाहते आहात? मग 'हा' स्पेशल शो बघाच!

Hans Zimmer: सोनी बीबीसी अर्थ आणि सोनी पिक्‍स यंदा वर्ल्‍ड म्‍युझिक डे निमित्त हन्‍स झिमरच्‍या चाहत्‍यांसाठी संगीतमय पर्वणी घेऊन आला आहे.

Tejashree Gaikwad

Hans Zimmer Hollywood Rebel: सोनी बीबीसी अर्थ आणि सोनी पिक्‍स यंदा वर्ल्‍ड म्‍युझिक डे (International Music Day) निमित्त हन्‍स झिमरच्‍या चाहत्‍यांसाठी संगीतमय पर्वणी सादर करण्‍यास सज्‍ज आहे. चॅनेल्‍सनी या दिग्‍गज संगीतकाराच्‍या संगीताप्रती योगदानासह २१ जून २०२४ रोजी दिवसभर सादर केली जाणारी लाइन-अप क्‍यूरेट केली आहे. उत्‍साहामध्‍ये अधिक भर म्‍हणजे, सोनी बीबीसी अर्थ आणि सोनी पक्सि एकाच वेळी दुपारी १२ वाजता व रात्री ९ वाजता 'हन्‍स झिमर - हॉलिवुड रिबेल' प्रसारित करणार आहे. हा शो प्रेक्षकांना दिग्‍गज संगीतकाराचे जीवन आणि कामाबाबत माहिती देईल.

काय बघायला मिळणार?

चित्रपट व माहितीपटांमधील लक्षवेधक संगीतरचनांसाठी लोकप्रिय अकॅडमी अवॉर्ड-विजेते संगीतकार हन्‍स झिमर दोन्‍ही चॅनेल्‍सवरील सर्वसमावेशक सेगमेंट्सच्‍या सिरीजमध्‍ये दिसणार आहेत. सोनी बीबीसी अर्थ 'हन्‍स झिमर - हॉलिवुड रिबेल'सह शोजची लक्षवेधक लाइन-अप प्रसारित करणार आहे, ज्‍यामधून पृथ्‍वीची भव्‍यता पाहायला मिळेल. चॅनेल 'फ्रोझन प्‍लॅनेट २'च्‍या फ्रोझन वर्ल्‍डससह पृथ्‍वीवरील सर्वात थंड प्रदेशांमध्‍ये घेऊन जाणार आहे, तसेच 'ब्‍ल्‍यू प्‍लॅनेट २' समुद्राखालील रहस्‍यांचा उलगडा करेल. या कन्‍टेन्‍ट लाइन-अपमधील 'नेचर्स ग्रेटेस्‍ट डान्‍सर्स', 'प्‍लॅनेट अर्थ २', 'सेव्‍हन वर्ल्‍डस्', 'वन प्‍लॅनेट' आणि 'फ्रोजन प्‍लॅनेट २ पीक्‍स अँड साऊथ' या शोजच्‍या माध्‍यमातून पृथ्‍वीवरील वैविध्‍यपूर्ण लँडस्‍केप्‍ससह वन्‍यजीवाबाबत माहिती मिळेल.

हन्‍स झिमर यांचे ब्‍लॉकबस्‍टर चित्रपट

दरम्‍यान, सोनी पिक्‍स चॅनेल 'हन्‍स झिमर - हॉलिवुड रिबेल'च्‍या प्रीमियरसह झिमर यांच्‍याद्वारे निर्मित ब्‍लॉकबस्‍टर चित्रपटांना देखील सादर करेल, ज्‍यामुळे प्रेक्षकांना सिनेमॅटिक कलाकृतींमध्‍ये त्‍यांचे संगीत अनुभवता येईल. त्यांच्या यादीमध्‍ये 'बॅटमॅन बीगिन्‍स', 'द डार्क नाइट', 'द डार्क नाइट राइजेज' आणि 'डंकर्क' या लोकप्रिय ब्‍लॉकबस्‍टर चित्रपटांचा समावेश आहे.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी