मनोरंजन

सुपरस्टार रजनीकांत रुग्णालयात दाखल

Swapnil S

चेन्नई : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत (७३) यांना सोमवारी रात्री येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सूत्रांनी सांगितले. येत्या एक-दोन दिवसांत त्यांना घरी पाठविण्यात येणार असल्याचे मंगळवारी रुग्णालयातून सांगण्यात आले.

रजनीकांत यांना ३० सप्टेंबर रोजी येथील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले. रजनीकांत यांच्या हृदयाजवळील रक्तवाहिनीला सूज आली होती, त्यावर विनाशस्त्रक्रिया उपचार करण्यात आले. या रक्तवाहिनीत स्टेण्ट टाकण्यात आले. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे, असे रुग्णालयातून सांगण्यात आले.

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांनी रजनीकांत यांच्या प्रकृतीला लवकर आराम पडो, अशी प्रार्थना केली आहे. त्याचप्रमाणे रजनीकांत यांच्या लक्षावधी चाहत्यांनी समाजमाध्यमांवरून त्यांच्यासाठी प्रार्थना केली आहे.

मविआचा तिढा सुटला! २६० जागांवर सहमती; २८ जागांवर रस्सीखेच; १-२ दिवसांत जागावाटप जाहीर होणार

पोलिसांवर हायकोर्ट संतापले; अतिरिक्त पोलीस आयुक्तांना हजर राहण्याचे आदेश

Maharastra Assembly Elections 2024: पक्षांतर्गत बंडाळीच्या धोक्यामुळे महायुती, मविआकडून सावध पवित्रा

नागरिकत्व कायद्यातील अनुच्छेद '६ए' वैध; सर्वोच्च न्यायालयाचा बहुमताने निर्वाळा

न्या. संजीव खन्ना हे आपले उत्तराधिकारी; सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी केली शिफारस