मनोरंजन

बिग बॉस विजेता सूरज चव्हाण आज अडकणार विवाहबंधनात; अजित पवार ते अक्षय कुमारपर्यंत मान्यवरांच्या उपस्थितीची चर्चा

बिग बॉस 5 चा विजेता म्हणून घराघरात पोहोचलेला सूरज चव्हाण आज विवाहबंधनात अडकणार आहे. दरम्यान या लग्न सोहळ्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार हजर राहतील. सोशल मीडियावर तशी निमंत्रण पत्रिका व्हायरल होत आहे..

Mayuri Gawade

बिग बॉस 5 चा विजेता म्हणून घराघरात पोहोचलेला सूरज चव्हाण आज विवाहबंधनात अडकणार आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याच्या लग्नाचे फोटो, प्री-वेडिंग लूक, नवीन घराचे व्हिडीओ आणि पारंपरिक कार्यक्रमांचे अपडेट्स सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

साखरपुडा, हळद आणि लग्न एकाच दिवशी

सूरज आणि संजना यांचा मोठा दिवस आज पुण्यातील सासवड येथील माऊली गार्डन हॉल येथे धुमधडाक्यात पार पडणार आहे. खास म्हणजे साखरपुडा, हळद आणि लग्न हे तिन्ही प्रमुख कार्यक्रम एकाच दिवशी आयोजित करण्यात आले आहेत. दुपारी १२ वाजता साखरपुडा, २ वाजता हळद आणि संध्याकाळी ६.११ वाजता लग्नसोहळा पार पडणार आहे.

उपस्थिती राहणाऱ्या पाहुण्यांची यादी

दरम्यान, या लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेचा एक फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला असून त्यात उपस्थिती राहणाऱ्या मान्यवरांची लांबलचक यादी पाहायला मिळते. विशेष म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि बॉलिवूडचा 'खिलाडी' अक्षय कुमार हेदेखील या सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याची चर्चा जोरात आहे.

याशिवाय अभिनेते रितेश देशमुख, अशोक सराफ, केदार शिंदे, वर्षा उसगांवकर, अभिजीत सावंत, उत्कर्ष शिंदे, निक्की तांबोळी, संग्राम चौगुले यांसारखे अनेक कलाकार आणि सेलिब्रिटींची नावे व्हायरल पत्रिकेत झळकत आहेत. त्याचबरोबर सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे यांसारख्या नेत्यांचीही उपस्थिती असल्याचे दिसत आहे.

राजकीय मान्यवरांसह मनोरंजनविश्वातील मोठ्या नावांची उपस्थिती पाहता सूरज आणि संजना यांचा हा लग्नसोहळा सेलिब्रिटींनी गजबजलेला भव्य समारंभ ठरणार यात शंका नाही.

नवी मुंबईला 'धुक्याऐवजी' प्रदूषणाचा विळखा; पहाटे व्यायामाला आलेले नागरिक प्रदूषित हवेत, 'हेल्दी सिटी'च्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह

Mumbai Rain : मुंबईसह वसई-विरारमध्ये मुसळधार पाऊस; अनेक भागांत पाणी साचलं, ऑरेंज अलर्ट जारी, VIDEO

Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या आझाद मैदानातील आंदोलनाला मुंबई पोलिसांचा नकार; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

Rajapur : गणपतीसाठी कोकणात निघालेल्या चाकरमान्यांच्या गाडीला भीषण अपघात; ८-१० जण गंभीर जखमी, वाहनाचा चक्काचूर

Hartalika Teej 2026 : यंदा हरतालिका अन् गणेश चतुर्थी एकाच दिवशी; उपवास कधी सोडायचा? जाणून घ्या संपूर्ण माहिती