मनोरंजन

Taambdi Chaamdi: मराठी डीजेची जगात भरारी!

सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेल्या ‘तांबडी चांबडी’ या गाण्याचा कर्ताधर्ता आहे क्रेटेक्स. नवशक्तिला दिलेल्या एक्सक्लुजिव्ह मुलाखतीत क्रेटेक्सने या गाण्याच्या मेकिंगची गोष्ट आणि त्याचा मराठी बाणा याविषयी दिलखुलासपणे सांगितलं.

निलीमा कुलकर्णी

जेव्हा महाराष्ट्रात नाईट क्लबमध्ये पंजाबी गाणी वाजत होती पण मराठी गाण्यांना मात्र बंदी होती, तेव्हा एका मुलाने मात्र याविरोधात सोशल मीडियावर ‘मराठी वाजलाच पाहिजे’ अशी पोस्ट केली आणि पाहता पाहता एक वर्षं झालं! आता क्लबमध्ये मराठमोळी गाणी दणक्यात वाजतात , कारण तो मराठी मुलगा होता सध्याचा लोकप्रिय मराठी डीजे क्रेटेक्स म्हणजेच कृणाल घोरपडे.

सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेल्या ‘तांबडी चांबडी’ या गाण्याचा कर्ताधर्ता आहे क्रेटेक्स. नवशक्तिला दिलेल्या एक्सक्लुजिव्ह मुलाखतीत क्रेटेक्सने या गाण्याच्या मेकिंगची गोष्ट आणि त्याचा मराठी बाणा याविषयी दिलखुलासपणे सांगितलं.

काही मराठी रिमिक्स आणि टेक्नो-म्युजिक गाणी केल्यानंतर एक ओरिजिनल गाणं संगीतबद्ध करावं अशी क्रेटेक्सची इच्छा होती. श्रेयस सागवेकरने दिलेले धमाकेदार शब्द पाहून क्रेटेक्सने तांबडी चामडी हे गाणं तयार केलं. या गाण्याचा म्युझिक व्हिडीओदेखील नुकताच प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे हे गाणं आता जगभरात गाजणार आहे. स्पिनिंग रेकॉर्ड्स या आंतरराष्ट्रीय संगीत कंपनीच्या चॅनेलवर ‘तांबडी चांबडी’ हे गाणं प्रदर्शित झालं आहे.विशेष म्हणजे त्या लेबलवरील हे पहिलंच मराठी गाणं आहे. संगीतकार क्रेटेक्स याचे ‘तांबडी चांबडी’ या गाण्याद्वारे संगीतसृष्टीत पदार्पण होत आहे. त्याने या गाण्याच पार्श्वसंगीत केलं आहे तर श्रेयस सागवेकर याने हे गाण लिहिलं असून गायलं देखील आहे.

'तांबडी चांबडी' गाण्याविषयी मराठी डीजे क्रेटेक्स सांगतो, “माझा आनंद गगनात मावत नाही आहे. माझ स्वप्न होत की माझं गाण स्पिनिंग रेकॉर्डस वरती कधीतरी यावं. ज्या रेकॉर्ड लेबलवरती जगभरातील डेव्हिड ग्वेट, मार्टिन गॅरिक्स, अफ्रोजॅक, डिमिट्री व्हेग्स एंड लाइक माइक, हार्डवेल, स्टीव्हओकी अश्या सुप्रसिद्ध कलाकारांची गाणी या आधी प्रदर्शित झाली आहेत आणि आता या विविध भाषेमधील टॉपच्या गाण्यांमध्ये आपलं मराठी गाण प्रदर्शित होत आहे ही माझ्यासाठी जणू एक स्वप्नपूर्ती आहे. या गाण्याच्या ऑडियोला भारतातच नव्हे तर जगभरात प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे आम्ही व्हिडीओच्या स्वरूपात गाण तुमच्यासाठी घेवून आलो आहोत. आणि आता लवकरच मी परदेशात मराठी गाण्याचे शो करत आहे. प्रेक्षकांच प्रेम कायम असच राहो. आणि मराठी भाषा, मराठी गाणी देशात नव्हे तर परदेशातही वाजू दे हीच सदिच्छा."

विरारचा क्रेटेक्स आता ऑस्ट्रेलियाला मराठी गाणी वाजवणार आहे. मराठी गाणी क्लबमध्ये वाजत नव्हती तेव्हा एक वर्षापूर्वी क्रेटेक्सने पुढाकार घेतला आणि बॉलीवूड आणि इंग्रजी गाण्यांसारखीच मराठी गाणीसुद्धा प्रेक्षकांना क्लबमध्ये ठेका धरायला लावतात हे सिद्ध केलं. यंदाच्या गणेश उत्सवात देखील मराठी गाणीच वाजली पाहिजेत, मराठी माणसाने त्याची मराठी संस्कृती जपली पाहिजे, बॉलीवूड गाण्यांपेक्षा मराठी गाण्यांना महाराष्ट्रात प्राधान्य दिलं गेलं पाहिजे, असं क्रेटेक्स ठामपणे सांगतो.

एवढंच नव्हे, तर बॉलीवूडमध्ये करिअर करण्याची त्याची इच्छादेखील नाही, असं तो स्वतः कबूल करतो. त्यापेक्षा मराठी गाण्यांचा डंका जगभरात वाजवायचा आहे आणि जगातल्या सर्वात मोठ्या क्लबमध्ये मराठी गाणं वाजवायची त्याची इच्छा आहे, असंही क्रेटेक्स सांगतो.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी