मनोरंजन

The Kerala Story : 'द केरला स्टोरी' चित्रपटाची अभिनेत्री अदा शर्मा च्या गाडीला अपघात ; सोशल मिडीयावरून दिली माहिती

अदा शर्माच्या 'द केरला स्टोरी' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. हा सिनेमा शनिवारी 100 कोटी क्लबमध्ये सामील झाला

नवशक्ती Web Desk

सध्या सर्वत्र एकाच चित्रपटाची चर्चा होताना दिसत आहे तो म्हणजे 'द केरला स्टोरी' (The Kerala Story). अभिनेत्री अदा शर्मा या  चित्रपटामुळे चांगलीच चर्चेमध्ये आली आहे.  या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे कौतुक होताना दिसत आहे. मात्र आज तिच्या चाहत्यांसाठी एक वेगळीच बातमी समोर येत आहे.  हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत असताना, चित्रपटाचे दिग्दर्शक सुदीप्तो सेन आणि अभिनेत्री अदा शर्मा 14 मे रोजी हिंदू यात्रेला जाण्यासाठी करीमनगरला जात असताना त्यांच्या वाहनाला अपघात झाला. सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना याची माहिती देण्यात आली.

अदा शर्माने सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांना हेल्थ अपडेट दिले आहे. तिने ट्विट केले, "मित्रांनो, मी ठीक आहे. सोशल मीडियावर आमच्या अपघाताच्या अनेक बातम्या व्हायरल होत आहेत. पण माझ्यासह आमच्या टीममधील सर्वजण ठीक आहेत. कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही. माझ्याबद्दल काळजी दाखवल्याबद्दल धन्यवाद".

चित्रपटाचे दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांनी ट्विट करून अपघाताची माहिती दिली. त्यांनी ट्विट केले होते की, "आज आम्ही आमच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी करीमनगरमध्ये एका कार्यक्रमाला जात होतो. पण दुर्दैवाने एका अपघातामुळे आम्हाला पुढचा प्रवास करता आला नाही. मी करीमनगरच्या लोकांची मनापासून माफी मागतो. आमच्या मुलींना वाचवण्यासाठी आम्ही हा चित्रपट बनवला आहे. कृपया आम्हाला पाठिंबा देत रहा."

अदा शर्माच्या 'द केरला स्टोरी' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. हा सिनेमा शनिवारी 100 कोटी क्लबमध्ये सामील झाला आहे. 100 कोटींचा टप्पा पार करणारा हा 2023 मधील चौथा चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुदिप्तो सेन यांनी केले असून विपुल शाह यांनी निर्मिती केली आहे.

पालिका निवडणुकांचे बिगुल वाजले! २९ महापालिकांचा महासंग्राम १५ जानेवारीला, १६ जानेवारीला मतमोजणी; आचारसंहिता लागू

म्हाडा वसाहतींच्या सामूहिक पुनर्विकासाला गती; २० एकरवरील प्रकल्पांसाठी नवीन धोरण जाहीर

'छडी लागे छम छम' बंद! शिक्षण विभागाने जारी केली नवी नियमावली; विद्यार्थ्यांना शारीरिक, मानसिक शिक्षा दिल्यास थेट कारवाई

महालक्ष्मी रेसकोर्सवर होणार सेंट्रल पार्क; आचारसंहिता लागू होण्याआधीच उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून घोषणांचा पाऊस

केंद्राच्या ‘मनरेगा’तून महात्मा गांधी बाहेर; आता योजनेचे नवे नाव ‘विकसित भारत-जी- राम-जी २०२५’