मनोरंजन

लव जिहादच्या आरोपावरुन 'हा' चित्रपट वादाच्या भोवऱ्यात; हिंदू संघटना आक्रमक

अदमदाबाद येथे काही हिंदू संघटनांनी या सिनेमाला विरोध दर्शवला आहे.

नवशक्ती Web Desk

सध्या देशात 'द केरला स्टोरी' या चित्रपटावरून बरेच वाद सुरु आहेत. अनेक राज्यांनी हा चित्रपट प्रपोगंडा असल्याचे सांगत त्याला विरोध दर्शवला आहे. या सिनेमात मुलींना कशा प्रकारे भुरळ घालुन त्यांचे इस्लाममध्ये धर्मांत केले जाते आणि नंतर त्यांना आयएसआयएसमध्ये भर्ती केले जाते, अशी कथा दाखवण्यात आली आहे. प्रचंड विरोध असताना देखील या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. आता 'द क्रिएटर: सृजनहार' हा चित्रपट वादात सापडल्याचे दिसून येत आहे. अदमदाबाद येथे काही हिंदू संघटनांनी या सिनेमाला विरोध दर्शवला आहे. त्यांचा या चित्रपटाच्या कथेला विरोध असल्याचे सांगितले जात आहे.

गुजरामधील अहमदाबाद शहरातील मल्टीप्लेक्सबाहेर बजरंग दलाचे काही कार्यकर्ते जमा झाले असू त्यांनी 'जय श्री राम' च्या घोषणा देण्यास सुरुवात केली आहे. हिंदू धर्माच्या रक्षणासाठी आम्ही सदैव तत्पर असल्याचे या कार्यकर्त्यांनी म्हटले आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओत देखील काही जण भगवे झेंडे हाताता घेऊन 'जय श्री राम'च्या घोषणा देताना दिसत आहेत. यावेळी ते चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करताना दिसत आहेत.

'द क्रिएटर: सृजनहार' या सिनेमात सीआयडी फेम अभिनेता दयानंद शेट्टी हा मुख्य भूमिका साकारत आहे. शाजी चौधरी, रोहीत चौधरी, रजा मुराद, निलू कोहली, अनंत महादेवन आणि आर्या बब्बर यांच्या देखील या सिनेमात भूमिका आहेत. राजेश कराटे यांनी या चित्रपटाची निर्मीती केली असून परवीन हिंगोनीया यांनी दिग्दर्शन केले आहे. 26 मे रोजी हा सिनेमा देशभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित केला जाणार आहे.

'द क्रिएटर: सृजनहार' या चित्रपटाला होणारा विरोध पाहता त्यांनी मी कोणत्याही धोक्याला घाबरत नसल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, "त्यांचे त्यांच्या धर्मावर प्रेम आहे, याच्याशी मला काही देणे घेणे नाही. कुणीही धर्माच्या नावावरुन हिंसा करु नये, अशी माझी सर्व धर्मीयांनी विनंती आहे. तुम्ही धर्माच्या नावाने एखाद्या व्यक्तीला मारता का? धर्माला मारा आणि माणुसकीला जपा", असे त्यांनी म्हटले आहे.

'द क्रिएटर: सृजनहार' या चित्रपटात वेगवेगळ्या धर्माच्या तरुणांची प्रेमकथा दाखवण्यात आली आहे. ज्या तरुणाच्या अवती-भोवती या सिमेमाची कथा फिरते तो मानतेच्या दृष्टीकोनातून धर्माची भिंत तोडून लोकांची परिक्षा घ्यायचे ठरवतो. लोकांनी धर्म विसरुन फक्त प्रेम करावे अशी त्याची इच्छा असते. मात्र, हा सिनेमा आता वादात सापडला आहे. बजरंग दल या हिंदू संघटनेने सिनेमाला विरोध दर्शवला आहे. त्यामुळे 'द क्रिएटर: सृजनहार' बॉक्स ऑफिसवर कितपत आपला ठसा उमटवतो हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

Maharashtra HSC Exam 2025 : पूरग्रस्त विद्यार्थ्यांना दिलासा; बारावीचा अर्ज भरण्यास मुदतवाढ

लॉरेन्स बिश्नोई गँग दहशतवादी संघटना म्हणून घोषित; कॅनडा सरकारचा मोठा निर्णय, टोळीसोबत व्यवहार केल्यास होणार शिक्षा

एका रात्रीत ३७ गायी, २० शेळ्यांचा बळी! पुरामुळे दुग्धव्यवसाय उद्ध्वस्त; धाराशिवच्या शेतकऱ्याचे ६० लाखांचे नुकसान, मदत अपुरी

वैष्णवी हगवणे प्रकरण : सासू-नणंदेचा पुणे न्यायालयाने फेटाळला जामीन; म्हणाले, "नऊ महिन्यांच्या बाळाची आई...

महाराष्ट्रात पावसाचे संकट; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची विशेष अधिवेशनाची मागणी